तहसिल प्रशासनाचे दुर्लक्ष ..नियम फक्त सामान्य नागरिकांनाच काय ?
पैठण । नंदकिशोर मगरे
सद्यस्थितीत कोरोना साथीच्या रोगाने पैठण शहरात थैमान घातला आहे त्यातच दररोज नविन रूग्णाची भर पडत असून शहरासह तालुक्यात कोरोना आजाराने पाय पसरल्याने शहरासह तालुक्यात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.शाररीक आंतर ठेवण्याचे नियम काटेकोर पणे पालन करण्याचे आदेश शासन स्तरावर वारंवार सांगितल्या जात आहे. मात्र सोमवार रोजी कॉग्रेस पक्षाच्या वतिने करण्यात आलेल्या आंदोलनात सर्व प्ररकारच्या नियमाला तितिलांजली देवून शाररीक आंतराच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे पहावयास मिळाले .
या बाबत सविस्तर वृत्त असे की , कॉग्रेस पक्षाच्या वतिने केंद्र सरकारच्या पेट्रोल दरवाढीच्या विरोधात पैठण तहसिलवर निदर्शने करण्यात आली .मात्र सद्यस्थितीत शहरासह तालुक्यात तब्बल 42 जनांना कोरानाची लागन झाली आहे .त्यातच प्रशासनाच्या वतिने मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात येत आहे .त्यातच प्रामुख्याने शाररीक अंतर ठेवून एकमेकांशी संवाद साधा असे अवाहनही केले जात आहे .मात्र कॉग्रेस पक्षाच्या या आंदोलनात नियमाची ’ एैसी की , तैसी करत पुर्णत: फज्जा उडाला असून प्रशासन सदरिल प्रकाराला किती गंभिरतेने घेईल याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चौकट
तहसिल प्रशासनाचे बचावत्मक धोरण
कोरोना साथीचा वाढता प्रभाव लक्षात घेता व तहसिल येथे पिक कर्जासाठी लागणा-या शेतीच्या फेरफारच्या नकलासाठी झालेली शेतक-यांची गर्दी पाहता तहसिल प्रशासनाने कर्मचा-यांना सुरक्षीत काम करता यावे यासाठी कार्यालयाचे मुख्यद्वार बंद करून सर्व विभागातील कर्मचा-यांनी गर्दीत न जाता खिडकीद्वारे लाभार्थ्यांची कामे करावी व शाररीक अंतर पाळावे रोगापासून बचाव होईल यामुळे हि कामाची पध्दत सुरू केली आहे .कुठलाच लाभार्थी कार्यालयात खुसू नये याची खबरदारी घेतली जात आहे .मात्र कॉग्रेसच्या आंदोलनाची गर्दी पाहता एक बाब प्रामुख्याने समोर येत आहे की , सामान्य नागरिकासाठी वेगळ तर पदाधिका-यासाठी वेगळा नियम का ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे .
Leave a comment