औरंगाबाद । वार्ताहर
गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच घेताना छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार यांना लाच लुचपत अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले आहे. प्रदीप हिरालाल धोटे (पोलीस हवालदार, छावणी पोलीस स्टेशन, औरंगाबाद) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या नातेवाईकवर दाखल करण्यात आलेल्या सीआरपीसी कलम 107 नुसार प्रतिबंधात्मक कारवाईचा बॉण्ड रद्द करण्यासाठी धोटे यांनी 2 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक अधिकार्यांकडे तक्रार दिली. त्यानुसार लाच लुचपत अधिकार्यांनी सापळा रचून पोलीस हवालदारास 2 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
Leave a comment