भराडी । वार्ताहर
रविवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा सन्माननीय शरद पवार साहेबांनी वक्तव्य केले की देवेंद्र फडणवीस साहेब प्रसिद्धीसाठी काही ही वक्तव्य देतात यावर दादाराव आळणे भाजपा प्रदेश सचिव भाजपा ओबीसी मोर्चा यांनी आरएनओ वृत्तसंस्थेच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमी अभ्यासपूर्ण वक्तव्य करतात त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळतेपत्रकार काही दुदखुळे नाहीत की कोणत्याही वक्तव्याला प्रसिद्धी देतील, तसेच राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री माननीय राजेश टोपे साहेब यांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही पुराणामध्ये बळी गेलेल्यांचे आकडे प्रसिद्ध केले आहे.
आम्हाला जर बळी गेलेल्यांचे आकडे लपवायचे असते तर आम्ही ते प्रसिद्ध केले नसते यावर दादाराव आळणे यांनी प्रतिक्रिया दिली की भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तसेच विरोधी पक्षातील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांनी विचारणा केली नसती व जनतेतून प्रतिक्रिया उमटल्या नसते तर ही आकडेवारी समोर आली नसती व सत्य परिस्थिती जनतेसमोर आली नाही नसती
Leave a comment