बोरगांव बाजार । वार्ताहर

सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील रहिवासी माधवराव भावराव कुंटे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून 21 फेब्रुवारी रोजी शेतातील शेडच्या लोखंडी अ‍ॅगलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती,सदर घटनेचा पंचनामा बीट जमादार देवीदास जाधव, मुस्ताक शेख यांनी करून या घटनेचा रीतसर पंचनामा करून  आत्महत्या केल्याचे पंचनाम्यात नमूद केले होते.या घटनेची आपत्ती व्यवस्थापन विभाग तहसील कार्यालय सिल्लोड यांनी तत्काळ दखल घेत मृताच्या पत्नीला तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते एक लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल,तलाठी संजय जोशी,श्रीराम कुंटे यावेळी हजर होते.सदरील धनादेशातील तिस हजार रूपये बचत खात्यावर जमा करून सत्तर हजार रूपये सहा वर्ष मुदतीकरीता मासिक प्राप्ती योजनेत लाभार्थ्याच्या नावे गुंतविण्यात यावे असे तहसिलदार रामेश्वर गोरे यांनी आपल्या पञात नमुद केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.