औरंगाबाद । वार्ताहर
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशजण घरीच बसून आहेत. मात्र काहीजण याचा सदुपयोग करून आपापले छंद जोपासत आहेत.
अशातच औरंगाबाद येथील गिरीजा ठाकूर यांनी दोन चिमुकल्या मुलांच्या साहाय्याने घरातील रद्दी पेपर, पुठ्ठे व थर्मोकोलचा वापर करून विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती बनवली आहे. तीन दिवसांवर आषाढी एकादशी आहे. प्रत्येकाला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घ्यावे वाटते. आम्हालाही विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जायचे होते, मात्र या वर्षी कोरोनामुळे आपल्याला विठ्ठलाचे प्रत्यक्षात दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे मी व दोन चिमुकली मुले आदित्य बोर्डे व साक्षी पाटील यांच्या मदतीने विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती बनवली आहे. यासाठी आम्हाला मंजू रणसिंग यांचे मार्गदर्शन लाभले, असे गिरीजा ठाकूर यांनी सांगितले.
Leave a comment