आज चार जणांचा मृत्यू

विभागीय आयुक्त केंद्रकरांनी दिला इशारा 

औरंगाबाद । वार्ताहर

गेल्या महिनाभरापासून औरंगाबादमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असून शहरातील संसर्ग ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. प्रशासकीय यंत्रणेनेतील अधिकार्‍यांमधील बेबनाव आरोग्य विभागातील अधिकार्‍यांचे दुर्लक्ष, नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन या सर्व गोष्टी संसर्ग वाढण्यास कारणीभूत असल्याने आगामी काळात औरंगाबाद 15 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दिला आहे. त्यांनी औरंगाबादच्या एकंदरीत परिस्थितीची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना व्हिसी द्वारे दिली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये लॉकडाऊन घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत. शिवाय कोरोना नियंत्रणाबाबत विभागीय आयुक्त्त केंद्रेकर यांनी सूत्रे हाती घ्यावीत, असे सुचविले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहर आणि औद्योगिक क्षेत्रात कडक लॉकडाऊन करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे. 5 जूनपासून लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता कोरोना प्रसारासाठी पोषक ठरली असून, औरंगाबाद पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. 

गुरुवारी जिल्ह्यातील विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सम, विषम पद्धतीने बाजारपेठा सुरू ठेवण्यास विरोध केला. तसेच लॉकडाऊन करण्याची मागणीदेखील केली होती; परंतु यापुढे लॉकडाऊन करण्यात येणार नाही, असे केंद्रेकर यांनी स्पष्ट केले होते.  मुख्यमंत्र्यांनीही गुरुवारच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये लॉकडाऊनचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे सूचित केले होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त याबाबत एकत्रित निर्णय घेऊ शकतात आणि लॉकडाऊन कडक पाळले जाणार असेल तर निर्णय व्हावा, कागदावरील लॉकडाऊन करण्यात अर्थ नाही.  कडक लॉकडाऊन करायचे असेल तरच निर्णय घ्या, असे मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला बजावले होते. त्या अनुषंगाने कडक लॉकडाऊनच्या हालचालींना वेग आला आहे. आयुक्त केंद्रेकर म्हणाले, रुग्णसंख्या वाढीचा वेग आणि मृत्यूदरात जर काही फरक पडला नाहीतर मोठे लॉकडाऊन करावेच लागणार आहे. लोकांनी ऐकले नाही आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनला आले नाहीत तर लॉकडाऊन करावेच लागेल. वेळप्रसंगी औद्योगिक वसाहतींमध्येदेखील लॉकडाऊन करावेच लागेल. मात्र असा निर्णय घ्यावा लागू नये यासाठी लोकांनी सुधारले पाहिजे, असे ते म्हणाले. 

जिल्ह्यात  2446 कोरोनामुक्त, 2082 रुग्णांवर उपचार सुरू 

 औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 2082 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 244 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत 238 जणांचा मृत्यु झाल्याने  जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  4766 झाल्याचे  जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
     जिल्ह्यात सायंकाळी आढळलेल्या 43 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. 

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण
सिंहगड कॉलनी (1), टिव्ही सेंटर, जाधववाडी (3),विठ्ठलनगर एन-2 (1),खोकडपुरा (2), जयभवानी नगर (1), नॅशनल कॉलनी (2), एम.जी.एम जवळ , एन-6 सिडको (1), गुरू दत्तनगर गारखेडा (1), भगवानपुरा (1), अरिष कॉलनी, कटकट गेट (1), मिलिंद नगर (1), सिटी चौक (1), एन 8 सिडको (1), फुले नगर उस्मानपुरा (1), सादात नगर (1), रेणुकामाता मंदिराजवळ, एन-9 सिडको (3), सुतगिरणी चौक, गारखेडा (1), शिवाजी नगर, सिडको (1),तेरावी योजना, जयभवानी नगर (2), शिवाजी नगर (1),
ग्रामीण भागातील रुग्ण
पोलिस स्टेशन रोड, वैजापूर (1), पैठण (1), वरुडकाजी (1), वाळुज, गंगापुर (2),बजाज नगर, वाळुज (1), गल्लेबोरगाव (1), फत्ते मैदान (1), शिवशंभुनगर, वैजापुर (1), बाभुळगांव ,वैजापुर (1), सप्तश्रृंगी कॉलनी, वलदगांव (1), ग्राम पंचायत शेजारी, सातारा परिसर (1), निलकमल हाऊसिग सोसा. बजाज नगर (1), जुने रांजणगांव, (1), वडगांव कोल्हाटी (1), समता कॉलनी वाळुज (1),

चार जणांचा मृत्यू

    आज दिवसभरात घाटीयेथे 4 जणांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत एकूण 238 जणांचा मृत्यू झालेला आहे. आज घाटीमध्ये भोईवाडा येथील 66 वर्षीय पुरूषाचा, बजाजनगर वाळूज येथील 57 वर्षीय पुरषाचा, संजय नगर, बायजीपुरा येथील 27 वर्षीय स्त्रीचा, संजय नगर, बायजीपुरा येथील 58 वर्षीय पुरूष रुगणांचा मृत्यू झालेला आहे.

१४ दिवसांतच ५० वर्षांखालील २० मृत्यू

 जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांत २१ ते ५० या वयोगटातील तब्बल २० जणांचा बळी गेला. ५ एप्रिल ते १० जून या कालावधीत या वयोगटात केवळ २४ जणांचा मृत्यू झाला होता; परंतु केवळ १४ दिवसांत हे प्रमाण वाढले.  औरंगाबाद शहरात ५ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. एप्रिलअखेरपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ ७ होती; परंतु मे आणि जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात १० जूनपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावणाºयांमध्ये ५१ ते ८० या वयोगटातील रुग्णांची  संख्या सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळाले, तर २१ ते ५० वयोगटात मृत्यूचे प्रमाण कमी होते. १० जूनपर्यंत म्हणजे अडीच महिन्यांत २१ ते ५० वयोगटातील २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे या वयोगटातील रुग्णांना फारसा धोका नसल्याचे सांगितले जात होते; परंतु याच वयोगटात २४ जूनपर्यंत एकूण ४४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. त्यामुळे १४ दिवसांत या वयोगटात २० बळी वाढले आहेत.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.