औरंगाबाद । वार्ताहर

कोरोनाचा प्रादुर्भाव औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे, लोकांच्या मृत्यू होतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यात यंत्रणेला अपयश येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसत नाही. अशा आशयाच्या वेगवेगळ्या माध्यमात प्रसिद्ध केलेल्या बातम्यांचा संदर्भ देत औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल केली आहे.

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात यंत्रणेला यश येत नाही असल्याबद्दल सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली होती. औरंगाबाद महापालिकेने केरळ आणि धारावी पॅटर्नचा अवलंब करायला हवा ही मागणी ही झाली. औरंगाबादचे महापालिका आयुक्त सध्या होम कॉरंटाईन आहेत. तर केरळ आणि धारावी पॅटर्नचा अवलंब केला जात नसेल तर मग दुसऱ्या कुठल्या मार्गांचा अवलंब केला जातो आहे, हे समजणे अवघड आहे. अशावेळी, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. अशा प्रकारच्या बातम्या उमटणे अत्यंत दुर्देवी आहे. आयएएस दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांत समन्वयाचा आणि संवादाचा अभाव असणे हेही दुर्देवी आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत हे दोन अधिकारी तसेच पोलिस यंत्रणेने एकत्रिपणे काम करणे आवश्यक आहे. मात्र औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात अशा प्रकारचा समन्वय नसल्याचे दिसत आहे, अशा शब्दात न्यायालयाने फटकारले आहे.

निष्काळजीपणा आणि अकार्यक्षमता दुर्देवी 

'मालेगाव पॅटर्न' हे तेथील अधिकाऱ्यांच्या समन्वयाचे यश आहे. त्यामुळे तिथे सक्सेस स्टोरी तयार होऊ शकली. औरंगाबाद आणि जळगावमध्ये मात्र अशी सक्सेस स्टोरी अधिकाऱ्यांना निर्माण करता आलेली नाही. साथरोग कायद्यामुळे सर्वाधिकार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्याकडे येतात. इतर कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक असते. अर्थात लोकशाही व्यवस्थेत राजकीय नेत्यांशी संवाद साधतच अधिकाऱ्यांनी काम करणे अपेक्षित आहे. औरंगाबादसारख्या जिल्ह्यात मात्र याचा अभाव आहे. अधिकाऱ्यांचा राजकीय नेत्यांशी संवाद नाही. असा निष्काळजीपणा आणि ही अकार्यक्षमता दुर्देवी आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे 

औरंगाबादमध्ये 'कॉटॅक्ट ट्रेसिंग' योग्य प्रमाणात न झाल्याने कोरोनाचा संसर्ग झपाट्याने झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक अधिकारी आपले काम प्रामाणिपणे करत नाहीत. अशा निष्काळजी आणि कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने फौजदारी कारवाई झाली पाहिजे. अशा लोकांना कामावरून काढून टाकले पाहिजे, असेही सुनावले आहे. आवश्यकता असताना ज्यांनी कामचुकारपणा केला अशा कर्मचाऱ्यांची माहिती द्यावी. कोरोनाबाधित रुग्ण आणि इतर रुग्ण यांच्यावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खाजगी रुग्णालयांची नावे कळवावीत, जिथे रुग्ण कॉरंटाईन आहेत, अशा ठिकाणी पूर्ण सुविधा आहेत का याची माहिती द्यावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

जळगावची 'ती' घटना अक्षम्य निष्काळजीपणाचे उदाहरण 

'कंटेंन्मेट झोन' तयार केले गेले, मात्र या झोनमधील व्यक्तींवर निर्बंध आणले गेले नाहीत. अधिकारी आणि पोलिस यंत्रणा यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही परिस्थिती उद्भवलेली असू शकते. पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांना या कायदेशीर प्रक्रियेत प्रतिवादी करून घेतले जात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा आदेश औरंगाबाद जिल्ह्यासाठी तर आहेच, जळगाव, अहमदनगरसह पूर्ण मराठवाड्यासाठी हा आदेश लागू आहे. जळगावसारख्या ठिकाणी कोरोनाबाधित वृद्धेचा मृतदेह विलगीकरण केंद्राच्या शौचालयात सापडतो आणि दोन दिवस तो तसाच पडून रहातो ही बातमी अक्षम्य निष्काळजीपणाचे उदाहरण आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 3 जुलैला होईल.

जिल्ह्यात 2116 रुग्णांवर उपचार सुरू, 201 रुग्णांची वाढ

  औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी  201 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामधील 125 रुग्ण मनपा हद्दीतील, 76 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामध्ये 114 पुरूष, 87 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 4723 कोरोनाबाधित आढळले असून 2373 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 234 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2116 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 
औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. 
लेबर कॉलनी परिसर (1), नंदनवन कॉलनी (1), आंबेडकर नगर (1),  भक्ती नगर, पिसादेवी रोड (1), चंपा चौक, शहा बाजार (1), गणेश कॉलनी (1), बुढ्ढी लेन, कबाडीपुरा (1), होनाजी नगर (2), सिडको (3), सावंगी (1), सुरेवाडी (1), भगतसिंग नगर (2), जालान नगर (1), हर्सुल परिसर (4),  अविष्कार कॉलनी (1), एन सात सिडको (1), बाबा पेट्रोल पंपाजवळ (1), मथुरा नगर, सिडको (1), नागेश्वरवाडी (1), सिडको एन सहा (2), तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी (3), बालाजी नगर (2), हनुमान नगर (3), भानुदास नगर (3), संजय नगर (3), गजानन नगर (10), विष्णू नगर (2), न्याय नगर (2), एन आठ, सिडको (2), रेणुका नगर (1), पुंडलिक नगर (2), न्यू हनुमान नगर (1), ज्योती नगर (1), मिल कॉर्नर (2), जय भवानी नगर (2), बेगमपुरा (1), उस्मानपुरा (3), नाथ नगर (1), जिन्सी बाजार (5), हर्षल नगर (1), सिडको एन अकरा (1), सिडको एन तेरा (2), सिडको एन दोन (2), विशाल नगर (2),  हडको एन बारा (1), जाधववाडी (3), सिडको एन सात (3), सिल्म मिल कॉलनी (1), न्यू विशाल नगर, गारखेडा (1), जुना बाजार (7), काबरा नगर, गारखेडा (2), छत्रपती नगर, बीड बायपास (3),  हिंदुस्तान आवास (2), अजब नगर (1), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (1), सिडको (1), टाऊन सेंटर (1),  जिजामाता कॉलनी (1), घृष्णेश्वर रुग्णालयाजवळ (1), गुरूदत्त नगर (4), शिवाजी नगर (3),  सातारा परिसर (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत
ग्रामीण भागातील रुग्ण   
कापड मंडई, पैठण (1), भांबरडा (4), कुंभेफळ (1), बेलूखेडा, कन्नड (2), वडनेर, कन्नड (2), सिडको वाळूज महानगर, बजाज नगर (1), स्वामी समर्थ नगर, आंबेडकर चौक, बजाज नगर (2), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (7), लोकमान्य चौक, बजाज नगर (2), शिवालय चौक, बजाज नगर (1), शिवालय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), बौद्ध विहारसमोर, बजाज नगर (1), लोकमान्य नगर, बजाज नगर (1), सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर (4), सिडको महानगर (1), यशवंती हाऊसिंग सोसायटी (1), न्यू दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी (3), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (2), श्रद्धा कॉलनी (1), जीवनधारा हाऊसिंग सोसायटी (1), ज्योर्तिलिंग हाऊसिंग सोसायटी (1), जय भवानी चौक (1), ऋणानुबंध हाऊसिंग सोसायटी (1), साऊथ सिटी (3), न्यू सारंग हाऊसिंग सोसायटी (2),  कोलगेट कंपनी जवळ (1), चिंचवन कॉलनी (1),  बजाज नगर (1), अश्वमेध हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), ग्रोथ सेंटर, सिडको वाळूज महानगर (1), साईश्रद्धा पार्क, बजाज नगर (1),  सिडको वाळूज महानगर एक (2), गणेश हाऊसिंग सोसायटी (1),  शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), श्रीगणेश हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), गोदावरी कॉलनी, पैठण (1), शिवाजी नगर, गंगापूर (2), गणपती गल्ली गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (8), पद्मपूर, गंगापूर (1), बालाजी नगर, सिल्लोड (1), बालेगाव, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.