एकाच कुटुंबातील 7 जण बाधित 

पैठण । वार्ताहर

सादात मौहल्ला येथील एका वयवृध्द महिलेला कोरोना रोगाची लागण झाल्याची घटना सोमवार रोजी उघडकीस आल्याने पुन्हा पैठण शहरातील नागरिकात या रोगा विषयी चिंतेची वाढ निर्माण झाली असून प्रशासनाने सदरिल महिला राहत असलेला परिसर सिल करून निर्जंतूकीरणाची फवारणी करून बाधित  कुटूंबातील 12 जनाचे चाचणी अहवाल घेतले असता पैकी सहा जनाचे अहवाल पॉजिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले असून एकून बाधितांचा आकडा सातवर पोहचला आहे.

दरम्यान शहरामध्ये ब-यापैकी बाजार पेठ सुरू असून शाररीक अंतर नियमावलीचा फज्जा उडाला असून  नियोजित वेळेत सुरू असलेल्या बाजार पेठेत ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतांना दिसत आहेत .त्यातच सदरिल गर्दी व नियमाची होत असलेली पायमल्ली पाहता बाधितांचा आकडा फुगण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही .प्रशासनाने वेळीच गर्दीसाठी ठोस उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.