कागदपत्रांसाठी शेतकर्‍यांची अडवणूक करु नये

पिक कर्ज वाटपाचे उदिष्ट तातडीने पूर्ण करावे

औरंगाबाद । वार्ताहर

खरीप हंगामासाठी बँकांनी शेतकर्‍यांना जलदगतीने पीक कर्जाचे वाटप करावे. साधारण जुलै महिन्याच्या अखेरपर्यत पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट बँकांनी पूर्ण करावे. पीक कर्जासाठी शेतकर्‍यांची कुठल्याही प्रकारे अडवणुक करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बँक अधिकार्‍यांना दिले. जिल्हाधिकार्‍यांनी आज खरीप पीक कर्ज वितरणाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेच  व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक ए.आर. शिंदे, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभाग प्रमुख ए.बी. थोरात आदींसह विविध बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. 

शेतकर्‍यांना पिक कर्जाचे सुलभ पध्दतीने वाटप करण्याची  सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले की,  पीक कर्जासाठी नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांकडून बँक व्यवस्थापनाने  सातबारा किंवा इतर कागदपत्रे मागू नयेत, ही कागदपत्रे बँकेने स्वत: ऑनलाईन डाऊनलोड करावीत किंवा तलाठयांकडे त्याची मागणी करावी. केवळ कागदपत्रांसाठी शेतकर्‍यांची अडवणुक करु नये. विशेष म्हणजे बँकांनी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांना जलदगतीने पीक कर्जाचे वाटप करावे. दरम्यान, उपस्थित बँक अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना कुठलीही अडचण भासू न देता  पिक कर्जाचे वाटप तातडीने करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. औरंगाबाद जिल्हयाला यंदा  रुपये 1196.80 कोटी  इतके पिककर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत 64 हजार 225 सभासदांना  321 कोटी 53 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. किसान क्रेडीट कार्डच्या संकेतस्थळावर पिक कर्जासाठी एक लाख 21 हजार 541 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती श्री. कारेगावकर यांनी दिली.  

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.