वैजापूर । वार्ताहर
ब्राम्हण महासंघाच्या औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सतिष खणाळे यांनी नुकतीच वैजापूर तालुका व शहर कार्यकारिणीची घोषणा केली. त्यांनी ब्राम्हण महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय कुलकर्णी, शहराध्यक्षपदी सुधीर लालसरे यांची नियुक्ती केली. महासंघाच्या महिला आघाडीचे प्रतिनीधित्व संतोषी भालेराव, रेवती लालसरे, प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तालुका उपाध्यक्षपद राजेंद्र लालसरे, बाळा सुतवणे, शहर उपाध्यक्षपद सोमण लालसरे व गिरीष भालेराव यांना सोपविण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, गोपनीय शाखेचे संजय घुगे, माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत, डॉ.अनिल जोशी, डॉ.एस एम जोशी यांनी नवनियुक्त कार्यकारणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तालुका कार्यकारणी : सचिव: रोहीत जोशी, राम पिल्दे, सहसचिव :डॉ अभय थावरे, चंद्रकांत गुरु, सल्लागार :प्रमोद कुलकर्णी, सदस्य सचिन जोशी, डॉ. महाजन शहर कार्यकरणी : कार्याध्यक्ष निलेश कुलकर्णी, सचिव: नागेश शिवुरकर,पंकज जोशी, सहसचिव :डॉ अश्विन जोशी,प्रसाद देशपांडे,रोहन कुलकर्णी, गणेश देशपांडे, मंगेश भालेराव, सल्लागार प्रमोद कुलकर्णी, सदस्य : मंगेश पैठणे, योगेश कुलकर्णी, सागर जोशी,जितेंद्र कुलकर्णी,अनिल कुलकर्णी.
Leave a comment