वैजापुर । वार्ताहर
वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील चोरवाघलगाव जवळ रस्त्यावरील खड्यांमुळे अंदाज न आल्याने इर्टीगा गाडी नंबर चक 05 Aइ 7916 पुलाचे डिव्हायडर तोडत पुलाखाली जाऊन पडली यात शेखर नवले आणि जय भारत प्रधान हे दोघेही गंभीर जखमी असून त्यांना गावकर्यांच्या व पोलिसांच्या मदतीने तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
वैजापूर-गंगापूर रस्त्याचे काम झाले खरे पण पुलांचे काम व पुलाजवळ 500 ते 1000 फुटापर्यंत रस्ता हा खड्डेमय असून त्याचे काम बाकी असल्याने या रस्त्यावर अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे या अपूर्ण राहिलेल्या रस्त्याचे व पुलाचे काम संबंधित ठेकेदार लवकर पूर्ण करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Leave a comment