औरंगाबाद । वार्ताहर
रेल्वेस्टेशन जहागीरदार कॉलनी येथील समाजसेवक मुसा खान तसेच भडकलगेट येथील मुख्तार खान बब्बू यांना कोरोना योध्दाने युवा शक्ती पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम यांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले. संघाचे अध्यक्ष यांनी म्हटले.
युवा शक्ती पत्रकार संघा तर्फे लॉकडाऊनचा काळात पोलीस, डॉक्टर, पत्रकार,समाजसेवक विविध संघटना तसेच समाजिक संघटनेने कोरोना या महामारीचा काळात जे समाजिक काम केलेले आहे अशांना युवा शक्ती पत्रकार संघाच्या वतिने सम्मानित करण्यात आले आहे. आज युवा शक्ती पत्रकार संघा तर्फे रेल्वेस्टेशन जहागीरदार कॉलनी येथील समाजसेवक मुसा खान लॉकडाऊनचा काळात जे कार्य केलेले आहे त्यांचे कार्याची दखल घेत संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम यांनी सम्मानपत्र देऊन सम्मानित केले आहे. मुसा खान यांनी पोलीसांना तसेच नागरिकांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप केलेले आहे. येथील लोकांना अन्नधान्य वाटप केलेले आहे. नागरीकांमध्ये वेळोवेळी जणजागरण केले आहे. तसेच पोलीस विभागाला ते सतत सहकार्य करीत आलेले आहे. याची दखल घेत मुसा खान यांना सम्मानित केले आहे. यावेळी संघाचे उपाध्यक्ष हफीज अली, सचिव जावेद खान, उपाध्यक्ष हसन शहा, सय्यद मोईन, मराठवाडा अध्यक्ष इरबाज अन्सारी, सल्लागार प्रविण बुरांडे, संजय हिंगोलीकर अनिस रामपुरे आदी उपस्थित होते
Leave a comment