औरंगाबाद । वार्ताहर
बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन औरंगाबाद या शासनमान्य संस्थेच्या वतीने र्लेींळव-19 योद्धा असणार्या विविध क्षेत्रातील कार्य करणार्या सर्व मानवी देवदूतांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रामदास वाघमारे ,संस्थेच्या सचिव मीरा वाघमारे, कोषाध्यक्ष अंशीराम वाघमारे ,उपाध्यक्ष प्रेरणा आझादे, जीवन वाघमारे, गौरव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कोररोना रुपी लढाईत रात्रंदिवस तन-मन-धनाने कार्य करणार्या पोलीस अधिकार्यांना आरोग्य विभागातील योद्ध्यांना सफाई विभागातील कामगारांना,आशा सेविकांना ,राजकीय क्षेत्रातील योध्दायांना ,विविध संस्थेच्या माध्यमातून कार्य करणार्या योद्ध्यांना आज सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये औरंगाबाद शहाराचे पूर्व विभागाचे आमदार अतुल सावे, पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे Aझख घनश्याम सोनवणे ,भारतनगर येथील डॉ.भंत्ते शांतिदूत , औरंगाबाद शहराचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ ,जालिंदर शेंडगे राजू शिंदे, पुंडलिक नगर विभागाच्या नगरसेविका मीनाताई गायके, बिट्टू गाडेकर ,सिद्धार्थ वाघमारे, तसेच तरुण युवा योद्धा अशा अनेक क्षेत्रात कार्य करणार्या सामाजिक संस्था धार्मिक क्षेत्रातील धर्मगुरू हे सर्व निस्वार्थ भावनेने आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या लढाईत कार्य करत आहेत त्याचा गौरव व्हावा या उदात्तभावनेने संस्थेच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
Leave a comment