सोयगाव । वार्ताहर
येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य डॉ.अशोक नाईकवाडे हे सेवानिवृत्त झाले. डॉ.अशोक नाईकवाडे हे जून 2015 पासून अजिंठा शिक्षण संस्थेच्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात प्राचार्य पदी रुजू झाले व सप्टेंबर 2017 मध्ये डॉ.अशोक नाईकवाडे यांची संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात बदली झाली.
त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाचे नॅक मुल्यांकन, वृक्षारोपण, एनआरएफ मुल्यांकन, आयएसओ मूल्यांकन व विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अनेक कार्य पूर्ण झाले. डॉ.अशोक नाईकवाडे यांनी महाविद्यालयाच्या विकासात मोलाची भर टाकली असे उदगार संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ नाना काळे यांनी काढले. या वेळी उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार, डॉ रावसाहेब बारोटे, कार्यालयीन अधीक्षक पंकज साबळे, राजेंद्र आहिरे, राजेंद्र दुतोंडे, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
Leave a comment