औरंगाबाद । वार्ताहर
समर्थनगर, पुष्पनगरी भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर युवासेना जिल्हाअधिकारी तथा नगरसेवक ऋषिकेश खैरे यांनी व मनपा प्रशासनाने तातडीने विविध ठिकाणी, परिसरात जंतूनाशक सॅनिटायझर, फवारणी करून नागरिकांना काळीज घेण्याचे आवाहन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, विभागप्रमुख विनोद बोरखडे, शाखाप्रमुख पंकज जोशी, सचिन जोशी, धनंजय पालोदकर, अमृता पालोदकर, अरुण मेढेकर, युवासेनेचे अक्षय कुंटे, विलास धर्माधिकारी, जितेंद्र शिंदे, वॉर्ड अधिकारी आठवले, उपअभियंता जे. बी. गाडेकर उपस्थित होते.
Leave a comment