जिल्ह्यात 126 कोरोनाबाधितांची भर

शहराची ही परिस्थिती अवघ्या 100 दिवसांत झाली

 

औरंगाबाद । वार्ताहर

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2046 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1408 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 126 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 3656 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बारी कॉलनी (1), वाळूज (3), गजानन नगर (3), गजगाव, गंगापूर (1), न्याय नगर, गारखेडा परिसर (1), मयूर नगर (3), सुरेवाडी (1), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (2), भाग्य नगर (5), एन अकरा, सिडको (2), सारा वैभव, जटवाडा रोड (2), जाधववाडी (4), मिटमिटा (3), गारखेडा परिसर (3), एन सहा, संभाजी पार्क (1), उस्मानपुरा (1), बजाज नगर, वाळूज (3), आंबेडकर नगर, एन सात (1), भारत नगर, एन बारा, हडको (1), उल्का नगरी, गारखेडा (1), नॅशनल कॉलनी (1), नागेश्वरवाडी (2), संभाजी कॉलनी (1), आनंद नगर (1), आयोध्या नगर, सिडको (1), शिवाजी कॉलनी, मुकुंवाडी (3), संत ज्ञानेश्वर नगर (1), राजे संभाजी कॉलनी (4), मुकुंदवाडी (1), न्यू पहाडसिंगपुरा, जगदीश नगर (1), काल्डा कॉर्नर (1), एन सहा, मथुरा नगर (1), नवजीवन कॉलनी, हडको, एन अकरा (4), एन अकरा (2), टीव्ही सेंटर (4), सुदर्शन नगर (1), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (5), जय भवानी चौक, बजाज नगर (2), महादेव मंदिर परिसर, बजाज नगर (1),  शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), सारा वृंदावन हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), स्वेदशिप हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (3), फुले नगरी, पंढरपूर (3), पंचमुखी महादेव मंदिराजवळ (1), करमाड (3), मांडकी (2), पळशी (4), शिवाजी नगर, गंगापूर (4), भवानी नगर, गंगापूर (1), कटकट गेट (2), जय भवानी नगर (1), लोटाकारंजा (1), यशराज आंगण, हर्सुल सावंगीजवळ (1), एन नऊ, संत ज्ञानेश्वर नगर, हडको (1), मुजीब कॉलनी, रोशन गेट (1), न्यू उस्मानपुरा, क्रांती चौक (1), सिंधी कॉलनी (1), गोरख कॉलनी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), पालखेड, वैजापूर (1), शिवाजी कॉलनी (1), सिडको (1), पद्मपुरा (2), एन नऊ, शिवाजी नगर, सिडको (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (1), दारूसालार मोहल्ला, पैठण (1), जयसिंगपुरा (1), शताब्दी नगर, हडको (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 54 स्त्री व 72 पुरुष आहेत.

आतापर्यंत 2046 जण कोरोनामुक्त

मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 2046 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

घाटीत आठ, खासगी रुग्णालयात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 21 जून रोजी दुपारी 3.15 वाजता रोशन गेट येथील 73 वर्षीय पुरूष, संध्याकाळी सात वाजता गारखेडा येथील 70 वर्षीय पुरूष, रात्री आठ वाजता कैसर कॉलनीतील 25 वर्षीय स्त्री, रात्री दहा वाजता हनुमान नगर, पुंडलिक नगर येथील 36 वर्षीय स्त्री, रात्री अकरा वाजता सिल्लोड येथील 55 वर्षीय पुरूष, 22 जून रोजी पहाटे 3.45 वाजता राजा बाजार येथील 62 वर्षीय पुरूष, सकाळी 7.45 वाजता उत्तम नगरातील 49 वर्षीय पुरूष आणि सकाळी दहा वाजता कोहिनूर कॉलनीतील 59 वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीमध्ये 151 कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 148 कोरोनाबाधित रुग्ण वास्तव्यास होते. 

शहरातील एका खासगी रुग्णालयात 21 जून रोजी रात्री 11.30 वाजता एन नऊ सिडकोतील 65 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा, 22 जून रोजी सकाळी 8.15 वाजता हर्सुल परिसरातील 71 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष, पैठण गेट येथील 31 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा सायंकाळी 6.45 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 148, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 53, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 202 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 

पहिल्या रुग्णाला झाले 100 दिवस

शहरात पहिल्या रुग्णाचे निदान होऊन 22 जून रोजी 100 दिवस पूर्ण होत आहेत. या 100 दिवसांत रुग्णसंख्येने एकवरून थेट साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या दोन महिन्यांत रुग्णसंख्या आटोक्यात येईल, असे वाटत असतानाच दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने  चिंता व्यक्त होत आहे. 

शहरात 15 मार्च रोजी पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. परदेशातून आलेल्या प्राध्यापक महिलेचा अहवाल यादिवशी पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. आरोग्य विभाग, मनपा प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कातील जवळपास 600 लोकांची तपासणी केली; परंतु कोणीही कोरोनाबाधित आढळून आले नाहीत. हा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आणि आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, एप्रिलपासून नवे रुग्ण सापडत गेले. शहरातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्ती निगेटिव्ह आढळून आली होती. त्यामुळे शहर दुसर्‍या टप्प्यापासून दूर होते. मात्र, त्यानंतर आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे शहर दुसर्‍या टप्प्यात पोहोचले. वाढत्या संख्येने आता शहर तिसर्‍या टप्प्यात गेल्याची भीती व्यक्त होत आहे. 15 मार्चपासून 26 एप्रिल रोजी एकेरी संख्येतच कोरोनाच्या रुग्णांचे निदान होत गेले. त्यानंतर 27 एप्रिल रोजी कोरोनाने दुहेरी संख्येत शिरकाव केला. या तारखेपासून शहरात रोज दुहेरी आकड्यांत कोरोनाच्या रुग्णांचे निदान होत आहे. यात 8 मे रोजी पहिल्यांदा तिहेरी आकड्यात रुग्णांचे निदान झाले. यादिवशी 100 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तर आता कोरोनाच्या रुग्णसंख्येने दिवसभरात दीडशेचा आकडाही पार केला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून दररोज नव्या रुग्णांचे निदान होत आहे. धक्कादायक म्हणजे सुरुवातीला काही भागांत मर्यादित असलेल्या कोरोनाने शहरातील बहुतांश भागांत शिरकाव केला आहे. शहराची ही परिस्थिती अवघ्या 100 दिवसांत झाली आहे.

राज्यात आज कोरोनाचे ३७२१ रुग्ण वाढले, तर ६२ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात ३७२१ रुग्णांची वाढ झाली असून ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज १९६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत ६७,७०६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४९.८६ टक्के झाले आहे. तर मृत्यूदर ४.६३ टक्के झाला आहे.

राज्यात सध्या ६,०१,१८२ जण होम क्वांरटाईन असून २६,९१० लोकं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या ६१,७९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ७,८७,४१९ नमुन्यांपैकी १,३५,७९६ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज राज्यात नोंदवण्यात आलेल्या एकूण ११३ मृत्यूंपैकी ६२ मृत्यू हे मागील ४८ तासातील असून ५१ मृत्यू हे आधीच्या काळातील आहेत. जे दैनंदिन स्वरुपात न दाखवता एकूण आकडेवारीत दाखवण्यात आले आहेत.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.