खुलताबाद । वार्ताहर
तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व तह सिलदार यांना राज्यात मागासवर्गीय व भटक्या, वंचित बहुजनांवर या चार महिन्यात मानवतेला लाजवेल अशा प्रकारे हत्त्या करणार्यांवर कारवाई करा ह्या मागणीचे निवेदन जिल्हा उपाध्यक्ष वसंता शिरसाट गल्ले बोरगावकर यांनी दिले आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,श्रद्धेय एड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व मा. प्रशांतजी बन जिल्हा अध्यक्ष, मिलिंद बोर्डे , श्याम भारसाखळे यांच्या नेतृत्वाखाली वंचितबहुजन आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, शाहू , आंबेडकर , भाऊ साठे यांच्या राज्यात झालेल्या अत्याचाराचा व पोलिस प्रशासन , प्रतिनिधी यांनी वेळीच खबरदारी घेतली असती तर प्रकार घडला नसता , याचा जाब विचारण्या साठी जन आंदोलनाची हाक दिली आहे. यावेळी बिघाडी सरकार मुर्दाबद इंडिया संविधान जिंदाबाद !! ही घोषणा देऊन निषेध केला.यावेळी राजाराम घुसळे , नितीन जाधव, बाबा पटेल, मुख्तार सय्यद, अजिनाथ बारगळ, नईम शहा, दिवेकर म्हैसमाळ ,बनकर आदि मान्यवर उपस्थित होते.
Leave a comment