संपर्कातील तिघे होम क्वॉरंटाईन
फर्दापूर । वार्ताहर
कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या फर्दापूर (ता.सोयगाव) येथील तिघांची आरोग्य तपासणी करुन तिघांनाही आरोग्य विभागाने 14 दिवसासाठी घरीच होम कोरोंटाइन केले असून बाधिताच्या संपर्कात आलेल्या तिघांची दरोज आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी श्रीनिवास सोनवणे यांनी दिली आहे.या बाबत सविस्तर वृत्त असे की औरंगाबाद हून दरोज अपडाऊन करणार्या सोयगाव पंचायत समितीच्या एका अधिकार्यांचा कोव्हीड 19 चाचणी अहवाल घाटी रुग्णालयात सकारात्मक आल्याची माहीती गुरुवारी तालुक्यात धडकल्याने एकच खळबळ उडून गेली होती.
सदरील कोरोना बाधित अधिकार्यांने वैयक्तिक शौचालय तपासणी निमित्ताने सोयगाव तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीना बुधवारी भेट दिल्याने सदरील अधिकार्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आरोग्य विभाग शोध घेत असतांना फर्दापूर येथील एका हॉटेल मध्ये बुधवार रोजी सदरील कोरोना बाधित अधिकार्याने जेवण केल्याची माहीती उघड झाल्याने तालूका आरोग्य अधिकारी श्रीनिवास सोनवणे यांच्या पथकाने दि.20 शनिवारी सकाळी बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या फर्दापूर येथील त्या हॉटेल मधील तिघांची आरोग्य तपासणी करुन त्यांना 14 दिवसासाठी घरीच स्ट्रीक होम क्वॉरंटाइन केले आहे, दरम्यान पुढील पाच दिवस बाधिताच्या संपर्कात आलेल्या तिघांची ही दरोज थर्मल गन व पल्स ऑक्सीमीटर च्या साहाय्याने आरोग्य तपासणी करण्यात येणार असून पुढील पाच दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांन मध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास तपासणी साठी त्यांचा स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती ही यावेळी तालूका आरोग्य अधिकारी श्रीनिवास सोनवणे यांनी दिली आहे.दरम्यान बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तिघांना स्ट्रिक्ट होम कोरोंटाइन करण्यात आले असून केवळ जीवनाश्यक वस्तू साठी त्यांच्या कुटूंबातील फक्त एका व्यक्तीला गावात येण्या-जान्याची मुभा देण्यात आली आहे. या बाबतची माहिती ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाला आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
Leave a comment