सिल्लोड । वार्ताहर

अंधारी तालुका सिल्लोड येथील जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या साखळी सिमेंट बंधार्‍यांमध्ये पहिल्याच पावसात पाणी आल्याने अंधारी गाव जलसमृद्धीने नटले आहे.  महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सिंचन प्रकल्पात आलेल्या पाण्याचे जलपूजन संपन्न झाले. मंगळवार ( दि.17)  रोजी ना. अब्दुल सत्तार यांनी अंधारी सर्कल मधील केरहाळा, पळशी,लोणवाडी, टाकळी, म्हसला खु. म्हसला बु. बोरगाव सारवणी, बोरगाव बाजार आदी गावांना भेटी दिल्या  यावेळी ना. अब्दुल सत्तार यांच्या अंधारी दौरा निमित्ताने जलपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी युवानेते अब्दुल समीर, तहसीलदार रामेश्वर गोरे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे , शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, डॉक्टर संजय जामकर ,कृउबा समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे , निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे , जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता कल्याण भोसले, आर.एस .पवार, तालुका कृषी अधिकारी दिपक गवळी, नायब तहसीलदार विनोद करमरकर, वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री अधिकार आदींची प्रमुख उपस्थिती होती. गेल्यावर्षी सिल्लोड तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने यावर्षी फारसा दुष्काळ जाणवला नाही. यंदा मृगातील पाऊस वेळेवर व समाधान कारक बरसल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे . अशी स्थिती कायम असली तर कोरोनामुळे डबघाईला आलेली देश व राज्यातील आर्थिक स्थिती पुन्हा उभारी घेईल असे प्रतिपादन ना. अब्दुल सत्तार यांनी जलपूजन प्रसंगी केले.  कोरोनामुळे काही शेतकर्‍यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसला तरी त्यांना नवीन कर्ज देणे सुरू आहे.  शेतकर्‍यांना कर्जमाफी तसेच नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असे स्पष्ट करीत कोरोनामुळे सर्वच नियोजन बिघडले , यातून कवकरच आपण बाहेर पडू यासाठी प्रत्येकाने सरकारला सहकार्य करावे असे आवाहन या प्रसंगी ना. अब्दुल सत्तार यांनी केले.

ना.अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जि.प चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या पुढाकाराने अंधारी येथील बोरडी नदीवर जवळपास सहा किलोमीटर अंतरावर जि.प.च्या सिंचन विभागाच्या वतीने पाच साखळी सिमेंट बंधारे उभारण्यात आले.  शिवाय नदीचे खोलीकरण करून रुंदीकरण करण्यात आले. या कामामुळे अंधारी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाला मोठ्या प्रमाणात आळा बसणार असून शेतकर्‍यांच्या विहिरींनाही या कामामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. शिवाय बर्‍याच वर्षांपासून अंधारी येथे ट्रॅकर ने पाणी पुरवठा होत असे आता गाव टँकर मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याने सरकारचा पाण्यावर होणारा खर्च वाचणार आहे.गेल्या दोन दिवसापूर्वी मृगातील पहिल्या पावसामध्ये या सिंचन प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने अंधारी गावचा परिसर जलसमृद्धी ने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कार्यक्रमास धैर्यशील तायडे,  अब्दुल रहीम, भानुदास नाना तायडे, लक्ष्मण गोरे, लक्ष्मण तायडे,अण्णा पांडव, जयवंता गोरे, वाहेद पटेल, कैलास सोंन्ने, श्रीरंग घरमोडे, भानुदास तायडे, बाळू क्षीरसागर, विठ्ठल तायडे, युनूस पटेल, मझर कुरेशी,अंकुश तायडे, योगेश तायडे आदींची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.