प्रथमच औरंगाबाद माल वाहतुकीचे मिळाले भाडे
सोयगाव । वार्ताहर
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्यातील मालवाहतुकीची घडी विस्कटली होती. ती सावरण्याबरोबरच तोट्यात चालनार्या एसटी महामंडळाने उत्पन्न वाढविण्यासाठी प्रवासी वाहतुकीप्रमाणेच बसेसव्दारे माल वाहतुकही सुरु केली आहे. त्या नुसार दि.17 गुरुवारी महामंडळाची मालवाहतुक करणारी बस सोयगाव येथुन औरंगाबाद रवाना झाल्याची माहीती आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी दिली .
मालवाहतुकीची आर्डर घेण्यासाठी सोयगाव बस आगारात स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बुकींग झालेनंतर एच्छीक ठीकानावर एसटी वालवाहू ट्रक उभा होत आहे, आर्थीक चणचणीत असलेली एसटी उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत शोधत आहे. उत्पन्न वाढीसाठी मालवाहतुक सेवेचा मालवाहतुक सेवेचा प्रस्ताव दोन वर्ष प्रलंबित होता. टाळेबंदीमुळे मालवाहतुकीची घडी विस्कटलेली आहे. उद्योगधंदे ,फळभाज्या पुरवठ्याकरीता पुरेशी वाहने व चालक उपलब्ध नाहीत. त्यातच सध्या महामंडऴाला 50 % भारमानानुसार म्हणजेच 22 प्रवाशी घेवून प्रवाशी वाहतुक लागत आहे. सोयगाव आगाराच्या बसेस जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमल बजावणी म्हणुन सिल्लोड, उंडनगाव, नागद जिल्हाअंतर्गत प्रवाशी वाहतुक सेवा सुरु करण्यात आली होती मात्र इंधनाचा खर्चही निधत नसल्याने तोटाच सोसावा लागला दरम्यान वरीष्ठांच्या आदेशाने प्रवाशी वाहतुक पुढील आदेशापर्यंत थांबवावी लागली. महामंडळाने मालवाहतुकीचा निर्णय घेतला. यासाठी एसटीच्या आयुर्मान पुर्ण केलेल्या बसची अंतर्गत रचना बदलुन ट्रकसारख्या रचनेत रुपातरीत करण्यात आले. औरंगाबाद येथील वर्क शॉप मध्ये हा प्रयोग राबविण्यात आला. एसटीची यंत्रणा माल वाहतुकीसाठी सज्ज करण्यात आली. महामंडळाला एक बस चालवण्यासाठी 42 रुपये 40 पैसे प्रतिकिलोमिटर खर्च येतो ; मात्र मालवाहतुकीसाठी जुनी मुदत संपलेली वाहने वारण्यात येत असल्याने प्रतिकिलोमिटर 28 रुपये आणि जीएसटी या प्रमाणे दर निश्चीती करण्यात आली आहे. सोयगाव येथील भुसार व्यवसाईक व्यापारी तुकाराम तायडे यांनी प्रथम भुसार माल बाजरीवाहतुकीसाठी आगारात बुकींग केली . त्यानुसार बुधवारी नउ टन भुसार माल औरंगाबाद येथिल मोढा आंबेडकर नगर यथिल व्यापारी सुभाष पंडीत यांना एैन्शी हजाराचा भुसार माल ट्रक क्र . एम . एच . 20 बी . एल .140 मध्ये लादुन चालक गजानन पेंदुर बुधवारी सायंकाळी रवाना झाले . औरंगाबाद 120 कि. मी. असुन प्रतिकिलोमिटर 35 रुपये प्रमाणे चार हजार दोनशे व जीएसटी दोनशे रुपये असे एकुण 4400 आगाराच्या उत्पन्नात जमा झाले.
Leave a comment