सिल्लोड । वार्ताहर
महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे शिवसेना वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार , नगराध्यक्षा राजश्री निकम, युवानेते अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण, शिवसेना तालूका प्रमुख किशोर अग्रवाल, सोयगाव शिवसेना तालूका प्रमुख दिलीप मचे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, डॉ.संजय जामकर,राजरत्न निकम,रवी गायकवाड, डॉ. दत्ता भवर आदींची उपस्थिती होती.
Leave a comment