औरंगाबाद । वार्ताहर
मद्य विक्रीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाला महिन्याभरात तब्बल 60 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अशी माहिती विभागाचे अधीक्षक एस. कदम यांनी दिली आहे. जिल्ह्यात विदेशी दारूचे सहा व बियर निर्मिती करणारे पाच कारखाने आहेत. यापैकी चार विदेशी दारू कंपन्यांनी प्रत्यक्ष निर्मिती केली.
मे महिन्यात या कंपन्यांनी 14 लाख 20 हजार लिटर दारूची निर्मिती केली तर 45 लाख 93 हजार लिटर दारू इतरत्र वितरित केली. तसेच बियर कंपन्यांनी मे महिण्यात 56 लाख 66 हजार लिटर बियरचे उत्पादन घेतले. व 73 लाख 31 हजार लिटर बियर इतरत्र वितरित केली आहे. यामधून शासनाला 60 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दरम्यान, तरुणाईचा कल विदेशी मद्याकडे जास्त असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाला यामधून मोठया प्रमाणात महसूल प्राप्त होतो. यात जिल्ह्याचा वाटा 30 टक्के एवढा असून दरवर्षी साधारणपणे तीन हजार कोटींचा महसूल जिल्ह्यातुन प्राप्त होतो.
Leave a comment