पाचोड । वार्ताहर
महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या शेतकर्यांना कर्जमाफी जाहीर केली या शेतकर्यांना कर्जमाफी झाल्याने पुढील कर्ज घेण्यासाठी बँकाकडे जावे लागत असून या बँक मध्ये गेल्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर या खातेधारकांना बँकेकडून पैठण तहसील कार्यालयाकडून फेरफार व सातबारा आणण्यास सांगण्यात येते. परंतु आता शेतकर्यांची हेलपाटे बंद होणार असून मागील वर्षी ज्या खातेदार शेतकर्यांनी बँकेकडून कर्ज काढले आहे त्या शेतकर्यांना नव्याने पीक कर्जसाठी सातबारा व फेरफार नक्कल मागू नये असे आदेश पैठण तहसीलदार यांनी काढले आहे.पाचोड येथे दोन राष्ट्रीयकृत व एक जिल्हा सहकारी बँक आहेत येथे नवीन कर्ज वाटप सुरू झाले असून यासाठी शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात बँकेत येणे सुरू झाले असून ऑनलाईन पीक मागणी अर्ज, सातबारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक तसेच सर्व बँकेच्या बॅबागे वगैरे सर्व देऊन बँकेत जावे लागते हे कागदपत्र जमा करताना शेतकर्यांची दमछाक होत असते.
त्यातच लाँकडाऊन असल्याने शेतकरी त्रस्त असून या शेतकर्यांना कर्ज प्रकरणासाठी बँकांकडून तहसील कार्यालयातून फेरफार नक्कल मागितली जात होती तेव्हा तहसील कार्यालय येथे गर्दी होऊ नये व कोणाचा संसंर्ग होऊ नये यासाठी तहसीलदार यांनी बँकांना आदेश दिले असून सदर कर्ज प्रकरणासाठी फेरफार नक्कल शेतकर्यांकडून मागू नये तसेच शेतकर्यांना लवकरात लवकर कर्ज प्रकरणे द्यावे असे आदेश काढले आहे.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन असून शेतकर्यांची मोठी गर्दी तहसीलमध्ये होत असून यावर्षी खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकरी बँकाकडून नव्याने पीक कर्ज मागणी करत आहे. त्यासाठी शेतकर्याकडून फेरफार नक्कल तहसील कार्यालयाकडून मागितले जात आहेत;परंतु ज्या शेतकर्यांनी अगोदर कर्ज घेतले आहे. त्या कर्जदाराकडून बँकांनी परत फेरफार नक्कल मागू नये
चंद्रकांत शेळके, तहसीलदार, तहसील कार्यालय पैठण
Leave a comment