औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद ग्रामीणच्या एस.पी.मोक्षदा पाटील यांच्यावतीने औरंगाबाद तालुक्यातील करमाड येथील रोज मजुरी करून पोट भरणार्या अशा कुटुंबांना रेशन किटचे वाटप करण्यात आले.
येथे दलित वस्ती मध्ये गोरगरीब ज्या महिला आहे अनलॉक झाल्यानंतर सुद्धा अशा महिलांना हाताला काम नाही. या महिला उपाशी राहू नये याकरिता ग्रामीण एसपी मोक्षदा पाटील यांच्या हस्ते रेशन कार्डचे वाटप यावेळेस सांगण्यात आले आपण सगळ्यांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन केलं तोंडाला मास लावले याबद्दल मी जनतेचे आभार मानते आपण एक दुसर्याला जितकी शक्य आहे तितकी मदत करणे गरजेचे आहे असंसुद्धा सांगण्यात आले यावेळेस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल करमाड पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष खेतमाळस करमाड चे सरपंच तुकाराम तारो, उपसरपंच दत्ता उकिर्डे, सय्यद कदिर,सय्यद समिर,महारुद्र ग्रुपचे व्यवस्थापक गणेश उकिर्डे, करमाड चे ग्रामसेवक रामदास पाथरे उपस्थित होते
Leave a comment