औरंगाबाद । वार्ताहर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी 20 लाख रूपयांचा आमदार निधी दिला आहे. यासंदर्भातील पत्र आज (दि.15) आ.सतीश चव्हाण यांनी शासकीय रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्याकडे सुपूर्द केले.कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हापातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कार्यवाहीला बळ देण्यासाठी राज्य शासनाने 27 मार्च 2020 रोजी एक वेळची विशेष बाब म्हणून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना प्रत्येकी 50 लाखाचा निधी उपलब्ध देण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात आ.सतीश चव्हाण म्हणाले की, माझा मतदारसंघ हा संपूर्ण मराठवाडा असल्याने कोविड-19 च्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेला निधी मराठवाड्यातील विविध शासकीय रूग्णालयांना यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी देण्यात येत आहे.

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री असणे गरजेचे आहे. यासाठी याठिकाणी मल्टी पॅरा मॉनिटर, डिजिटल बी.पी.ऑपरेटर, डिजिटल प्लस्कोमिटर, बेबी ट्रॉली, ट्रान्सपोर्ट इन्क्युबेटर, रेडीयंट वार्मर, पल्स ऑक्सीमीटर, सिरींग पंप, फोटो थेरपी, पोर्टेबल सक्शन, इन्फ्रा रेड थर्मामीटर, डिजिटल इन्फांट वेविंग स्केल, सेल्फ इन्फ्लेटिंग बॅग, लायरनगोस्कोप, ऑक्सिजन हूड आदी यंत्रसामुग्री माझ्या निधीतून देण्यात येणार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.