वीज बिल भरून सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन
औरंगाबाद । वार्ताहर
महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडल अंतर्गत 8 जिल्हयात 21,95,679 घरगुती, व्यापारी, औघोगिक व इतर वीज ग्राहकांकडे 2,863.45 कोटी रूपयांची थकबाकी आहे. लॉकडावून कालावधीत वीज ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा न केल्याने थकबाकीचा डोंगर वाढतच गेला आहे. मराठवाडयात कन्टेंमेंट झोन परिसर वगळता इतर भागातील वीज बिल भरणा केंद्र व प्रत्यक्ष मीटर रिडींगची प्रक्रीया सुरू करण्यात आलेली आहे.ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण औरंगाबाद प्रादेशिक विभागातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलाच्या 8 जिल्हयात गेल्या लॉकडावूनच्या मार्च, एप्रिल व मे 2020 या तीन महिन्यांसह थकीत असलेल्या घरगुती, व्यापारी, औघोगिक ग्राहक, शहरातील पथदिवे, सार्वजनिक पाणी पुरवठा व कृषीपंप वगळता इतर 21,95,679 वीज ग्राहकांकडे 2,863.45 कोटी रूपयांपेक्षा जास्त वीज बिलाची थकबाकी आहे. महावितरण औरंगाबाद परिमंडलात 7,20,636 वीज ग्राहकांकडे 658.35 कोटी रूपयांची थकबाकी आहे. लातूर परिमंडलात 7,48,284 वीज ग्राहकांकडे 1,226.60 कोटी रूपयांची थकबाकी आहे. नांदेड परिमंडलात 7,26,759 वीज ग्राहकांकडे 978.50 कोटी रूपयांची थकबाकी आहे.
परिमंडल ग्राहक थकबाकी कोटी रु.
औरंगाबाद 7,20,636 658.35
लातूर 7,48,284 1,226.60
नांदेड 7,26,759 978.50
एकूण 21,95,679 2,863.45
महावितरण कंपनी ही महानिर्मिती कंपनीसह खाजगी वीज निर्मिती कंपनीकडून वीज विकत घेते. ही वीज महापारेषण कंपनीकडून महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्रापर्यंत पोहचविली जाते. नंतर महावितरण कंपनीकडून ही वीज वीज ग्राहकांपर्यंत पोहचविली जाते. वीज खरेदीपोटी व वहन खर्चाचे पैसे दरमहा या कंपन्यांना दयावे लागतात. लॉकडावून कालावधीत वीज ग्राहकांनी वीज बिल भरणा केंद्र सुरू नसल्यामुळे वीज बिलाचा भरणा केलेला नाही. माहे एप्रिल व मे 2020 मध्ये मराठवाडयात फक्त 86.40 कोटी रूपयांचा वीज बिलाचा भरणा झालेला आहे. वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे पैसे दरमहा महावितरणकडे भरणा न केल्यास वीज खरेदी करणे कठिण होवू जाते. अशा परिस्थितीत महावितरणला आपला आर्थिक गाडा चालविणे कठिण झालेले आहे.वीज ग्राहकांनी नियमित वीज बिलाचा भरणा केल्यास अधिक दर्जेदार सेवा देणे शक्य होईल. कन्टेमेंट झोन परिसर वगळता मराठवाडयातील वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत.तसेच प्रत्यक्ष मिटर रिडींगही सुरू करण्यात आलेली आहे. तसेच ऑनलाईन वीज बिलही भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणचे अधिक्रत वीज बिल भरणा केंद्र, खाजगी अधिक्रत वीज बिल भरणा केंद्र, शहर को ऑपरेटिव्ह बँका, बुलढाणा अर्बण सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँका, ईवॉलेट केंद्र इत्यादी ठिकाणी वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यात औरंगाबाद परिमंडलात 274, लातूर परिमंडलात 221, नांदेड परिमंडलात 236 अशी मराठवाडयात 731 अधिक्रत वीज बिल भरणा केंद्रावर वीज भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. वीज ग्राहकांची वीज बिलाबाबत काही तक्रार, शंका असल्यास जवळच्या महावितरण उपविभागीय कार्यालयात आपली तक्रार नोंदवून पोहच घ्यावी. या तक्रारीचा शहानिशा करून निपटारा करण्यात येईल. वीज ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे विनंम्र आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांनी केले आहे.
Leave a comment