मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा उपक्रम
फर्दापूर । वार्ताहर
कोव्हीड 19 विषाणू संसर्ग व आपत्ती काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या सामाजिक कार्या बद्दल फर्दापूर पोलिस व पत्रकारांना कोव्हीड योध्दा हे सन्मानपत्र देवून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या वतीने दि.14 रविवार रोजी सन्मानित करण्यात आले.देशभरात कोव्हीड 19 विषाणू संसर्ग थैमान घालत असतांना ही पोलिस,डॉक्टर,पत्रकार,सफाई कर्मचारी आदीनी आपले कर्तव्य न डगमगता बजावले आहे.
या कार्याची पावती म्हणून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चा या सर्व क्षेत्रातील योध्द्यांना कोव्हिड योध्दा म्हणून गौरविण्याचा मानस असल्याचे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चे तालूकाध्यक्ष काकासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले दरम्यान यावेळी फर्दापूर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे,अजिंठा पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक किरण आहेर पो.कॉ ज्योती परळे,ज्ञानेश्वर सरताळे,संजय कोळी,दिपक सोनवणे,प्रविण गवई,नारायण खोडे,नारायण जिरी,सचिन केंद्रे आदीन सह पत्रकार सागर भुजबळ,शरद दामोदर यांना कोव्हीड योध्दा हे सन्मान पत्र देवून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या वतीने गौरविण्यात आले यावेळी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे सिल्लोड तालूकाध्यक्ष काकासाहेब पाटील मोरे,समन्वयक नारायण फाळके सिल्लोड शहर अध्यक्ष शिवाजी पाटील गायकवाड आदींची उपस्थिती होती.
Leave a comment