विहामाडंवा । वार्ताहर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त 15 जुन रोजी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास पैठणच्या वतीने वृक्षारोपण व रोपांचे वाटप करण्यात आले.
अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णांना आरोग्यदायी शतायुष्य लाभो, या अभिष्टचिंतनासह कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साजरा करण्यात आलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात वृक्षारोपण करून रोपांचे वाटप करण्यात आले. हि वेगवेगळ्या प्रजातींच्या झाडांची 50 रोपे पैठण कमिटीचे सदस्य विष्णूपंत सोनार यांनी स्वतः घरी तयार केली. ती रोपे सर्व सदस्यांनी वेगवेगळ्या भागात सोयीनुसार यावेळी लावली. याप्रसंगी विष्णू ढवळे, अॅड. संदीप शिंदे, गणेश जुंजे, विष्णू सोनार, भाऊसाहेब पठाडे, संजय वाघमारे, महेश चन्ने, शंतनु सोनार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Leave a comment