शेतीच्या कामांसाठी शेतकर्यांची धावपळ झाली सुरु
खुलताबाद । वार्ताहर
राज्यात मॉनसून दाखल झाल्यानंतर खुलताबाद तालुक्यातही अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे तालुक्यातील बसराई, भडजी, सुल्तानपुर, टाकळी राजेराय, बाजार सावंगी आदि भागातील शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. खुलताबाद शहरसह संपूर्ण तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने शेतामध्ये पाणी साचले असुन शेततिल पेरणीपूर्वी मशागतीचे कामे उरकून पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा यामुळे सुखावला आहे.
या दमदार पावसामुळेच तालुक्यातील शेतकर्यांनी कापुसबरोबरच, मका, अदरक,आदिंची पेरणी हाती घेतली आहे. दरम्यान शेतकर्यांनी खते व बियाणे तसेच पेरणीशी निगडित इतर साहित्य आपापल्या घरी घेऊन शेतकरी राजा आता पावसाच्या प्रतीक्षेत असतांना शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावली या पावसामुळे काही ठिकाणी शेततलाव तसेच शेतबंधार्यात पावसाचे पाणी साचले आहे. तर झालेल्या पावसामुळे पेरणीस मदत होणार असुन बळीराजा मात्र सुखावला आहे. गेल्या तीन चार वर्षांत खरीप किंवा रब्बी यापैकी कोणत्या न कोणत्या हंगमातील पिके शेतकर्यांसाठी नुकसाकारक ठरली होती. यावर्षी तरी दोन्ही पदरात पडावीत अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.
Leave a comment