भराड़ी । वार्ताहर
पहिल्याच पावसात सराटी-बाळापुर रस्त्याचे तीनतेरा झाले असुन सदरील रस्ता मजबुतीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
सिल्लोड तालुक्यातील सराटी-बाळापुर रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम तीन - चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करण्यात आले. सदरील रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम हाती घेतले खरे पण सदरील मजबुतीकरणाचे काम खुपच निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याने पहिल्याच पावसात रस्त्यावरील खडी उघडी पडून जागोजागी खड्डेही पडली आहे. रस्त्याचे कडेला पावसाचे वाहणारे पाणी काढण्यात आले नसल्याने थेट रस्त्याने पाणी वाहल्याने जागोजागी खड्डे पडून खडी उघडी पडली आहे परिणामी नागरिक - वाहनधारकांना खुपच ञास सहन करावा लागत आहे. पहिल्याच पावसात सदरील रस्त्याचे तीनतेरा झाले असुन सदरील कॉन्ट्रॅक्टरकडुन नव्याने काम करुन घ्यावे असी मागणी परिसरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे
Leave a comment