औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना या महामारी ने त्रस्त असलेल्या लोकांना मदत म्हणून आज पुरवठा विभागाने इस्कॉन अन्नमित्रा यांच्यातर्फे दिनांक 13 जून रोजी नॅशनल कॉलनी येथील नागरिकांना अधिकारी मार्फत ज्यांच्याकडे शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना राशन वाटप करण्यात आले काँग्रेस किसानचे अनिस पटेल यांच्या हस्ते नागरिकाला देण्यात आले.
औरंगाबाद पुरवठा अधिकारी महादेव किरवले यांनी किसान काँग्रेसचे अनिस पटेल यांच्या विनंतीला मान देऊन गरजूं लोकांना इस्कॉन अन्नमित्रा यांनी आज रोज़ी दि 13 जून रोज़ी 60 राशन किट नशनल कॉलोनी, भीमराज नगर, गीता नगर येथे पाठविले होते.काँग्रेसचे किसानचे अनिस पटेल यांच्या हस्ते नागरीकांना राशन किट देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव किसान काँग्रेस चे अनिस पटेल औरंगाबाद युवक कांग्रेस माजी अध्यक्ष खालिद पठान, संजय जाधव, मिनाज पटेल, शाहरुख खान, कल्याण दाभाडे, जाविद शेख, शकील खान, आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाविद पटेल व शाहरुख नुर खान यांनी परिश्रम घेतले.
Leave a comment