कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसांगी तालुक्यातून कुंभार पिंपळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे आठवड्यातील पहिला दिवस सोमवार ता. 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र बँकेसमोर बँक खातेदारांनी जनधन योजनेचे मानधन, निराधारांचा पगार ,पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे अनुदान, गॅस अनुदान विविध अनुदान व नियमित खाते व्यवहार आर टी जी एस अशा विविध कामानिमित्त रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या महाराष्ट्र बँकेत 20 -25 गावांचा रोजचा व्यवहार होतो कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढत असून लॉक डाऊनचा कालावधी आनखी वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी बाजारपेठेत सोमवारी नेहमीसारखीच गर्दी केली होती.सोशल डिस्टनसिंग चा नागरिकांकडून फज्जा उडाला आहे बँकेने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून रोखण्यासाठी सोशल डिस्टनसिंग ठेवण्यासाठी कडक अवलंब केला पाहिजे.
संचारबंदीत लोकांनी घराबाहेर पडू नये दैनंदिन व्यवहार करताना 2 व्याक्ती मध्ये सोशल डिस्टन्स ठेवण्यात यावे असे बंधन असतानाही सोमवारी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती पोलिस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन सदरील गर्दी पांगवण्यात आली.गर्दी पांगवण्यासाठी पौलीसाना नाविलाजाने आपल्या अधिकारांना ना वापर करावा लागला, अनेकांची पोलीस खाक्या पाहायलाच धांदल उडाली, गाडल्या रोडवर ठेऊन गल्लीत पळाली. ककिहीना चांगाल चोप दिला. बँक प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन बँकेत येणार्या ग्राहकांना मास्क लावण्याची, सोशल डिस्टनसिंग नियमाचे पालन करण्याची, हाताला सॅनिटायझर लावण्याची अशी सक्ती करावी बँक प्रशासनाने सोशल डिस्टन्सचा वापर करण्याची गरज असल्याची नागरिकांतून मागणी पुढे येत आहे .
Leave a comment