बदनापूर । वार्ताहर
कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मागील 17 मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू करण्यात आल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकर्यांचा कापूस विक्री अभावी घरातच पडून होता. या कापूस उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला असून कृषी उत्पन्न् बाजार समितीचे सभापती तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेऊन सीसीआय कापूस विक्री सुरू केली असून आज बदनापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्ये कापूस खरेदीची सुरूवात खोतकर यांनी केली. ऑनलाईन प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली असून त्यानुसार ही खरेदी होत आहे. 5200 ते 5300 रुपयांचा भाव आज शेतकर्यांना मिळाल्यामुळे शेतकर्यांतही आनंद होता.बदनापूर तालुक्यातील नगदी पिक म्हणून कापूस हे पीक ओळखले जाते. या वर्षीही तालुक्यातील एकूण जमिनीपैकी जवळपास 70 टक्के शेतकर्यांनी कापूस लागवड केलेली आहे.
कित्येक शेतकरी खरीपाचा हंगाम संपल्यानंतर रब्बी हंगामाती पिकांच्या मशागतीत व्यस्त असतात. रब्बी हंगामाच्या काढणी झाल्यानंतर म्हणजे गुढीपाडव्याच्या पुढे मागे कापूस विक्री करतात. यंदा मात्र कोरोना रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून 17 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे बदनापूर तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या घरातच कापूस पडून राहिला. त्यानंतरही लॉकडाऊनचा कालावधी वाढतच गेल्यामुळे व कापूस खरेदी होत नसल्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंता व्यक्त होत होती. दरम्यान माजी राज्यमंत्री तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनीही शेतकर्यांचा कापूस विक्री व्हावा म्हणून शासनस्तरावर प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कापूस खरेदीसाठी मुभा दिल्यानंतर सीसीआय व कृष्ज्ञी उत्पन्न बाजार समितीकडून कापूस खरेदीसाठी शेतकर्यांकडून ऑनलाईनरीत्या ङ्गॉर्म भरून घेण्यात आले या नंतर प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली असून त्या प्रतिक्षा यादीनुसार सेामवारपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरूवात करण्यात आलेली आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अतर ठेवण्यासाठी प्रतिक्षा यादीत असलेल्या शेतकर्यांना सुरक्षीत अंतर ठेऊन ही कापूस खरेदी होत आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता या खरेदीचा शुभारंभ माजी राज्यंमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कापूस विक्रीसाठी उपस्थित असलेल्या पहिल्या शेतकर्याचा खोतकर यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. सीसीआयने मास्टराईज तपासून 5200 ते 5400 पर्यंत भाव यावेळी कापूस उत्पादक शेतकर्यांना दिला. यावेळी खोतकर यांनी शेतकर्यांच्या हितासाठी मुख्यमंत्रयांनी खरेदीस मान्यता दिल्याबददल आभार व्यक्त करून ऑनलाईन अर्ज दाखल करून तात्काळ कापूस विक्री करण्याचे आवाहन शेतकर्यांना केले. त्याचप्रमाणे शेतकर्यांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी सांगितले की, कापसाप्रमाणेच मोसंबी खरेदीही समितीमार्ङ्गत करण्यात येत असून शेतकर्यांनी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करून आपली मोसंबी विक्रीसाठी आणावी असे सांगितले. यावेळी अभिमन्यू खोतकर, पंडितराव भुतेकर, भाऊसाहेब घुगे, निवृत्ती डाके, गजानन जर्हाड, छोटूसिंग दुलत यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी, सीसीआयचे कर्मचारी व अधिकार्यांची उपस्थिती होती.
Leave a comment