मंठा । वार्ताहर
कोरोना संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे गरजांचे हाल होऊ नये. यासाठी मंठा पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी स्वतःच्या शेतातील 3 कुंट्टल गहू गरजूंना वाटप केले.यापूर्वीही त्यांनी जीवनावश्यक साहित्य देऊन गरजूंना वेळोवेळी मदत करत आहेत. त्याचप्रमाणे ता.26 रविवार रोजी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत त्यांनी गरजवंतांना गव्हाचे वाटप केले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष सिराज पठाण, माजी सभापती संतोष वरकड, बाजार समितीचे संचालक वैजनाथ बोराडे , फौजदार विजय जाधव, नितिन गट्टुवार , पो. हे.कॉ. मंजितसिंग सेना , इंदल राठोड , पप्पु दायमा यांच्यासह कर्मचार्याच्या हस्ते या धान्याची वितरण केले. यावेळी बोलतांना पो.नि. निकम म्हणाले की, कोरोना संसर्गजन्य आजाराचा आज घडीला तालुक्यात एकही रुग्ण नाही. तर या सुरक्षितेच्या लढ्यात प्रशासनास सर्व नागरिकांनी केलेले सहकार्य यापुढेही असेच राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच दानशुरांनी गरजवंताला केलेल्या मदतीचे फोटो काढू नये व प्रसार माध्यमावर टाकू नये , अशी विनंती त्यांनी यावेळी केली.याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे म्हणाले की , मंठा पोलीस ठाण्याकडुन वेळोवेळी गरजुंना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी मागील आठवड्यात जिवनावश्यक वस्तु आणि आता धान्य वितरित केले.स्तुत्य अशी कामगिरी व उपक्रम राबवत सामाजिक दायित्वाची भुमिका पार पाडली असल्याचे शेवटी बोलतांना सांगितले.
Leave a comment