औरंगाबाद । वार्ताहर

देशावर आलेल्या कोरोना या संकटाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रावर झाला आहे. त्यातच औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या 95 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत एकट्या औरंगाबादमध्ये 42 रूग्णांची वाढ झाली आहे. त्यातील 6 जण 16 वर्षांखालील तर 7 जण 44 वर्षांखालील आहेत. आतापर्यंत औरंगाबादमधील 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सहा जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औरंगाबाद शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील सर्व धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आली आहेत. असे असूनदेखील औरंगाबादमधील मुस्लिम समाजातील काही लोक नमाजसाठी एकत्र जमले होते. यावेळी नमाजासाठी एकत्र जमलेल्या लोकांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांकडून संबंधित प्रकरणातील 27 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर 1 पोलीस आधिकारी, 2 कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

मुस्लिम समाजातील काही लोक बिडकीन शहरातील संभाजीनगर मार्गावरील अमिरनगर-प्रकाश नगर येथे धार्मिक स्थळी सामुहिक नमाजसाठी एकत्र आल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोलीस तत्काळ पोहोचले आणि लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांवरच संतप्त जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.