खुलताबाद । वार्ताहर
दौलताबाद येथील एक 53 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुर्ण गावच सिल करण्यात आले आहे. दौलताबाद येथील एका महिलेला कोरोनाची लागन झालेली असल्याचे समजताच ति महीला जिथ राहती तो परिसर आणि पुर्ण गावच सिल करण्यात आले आहे.
गावकर्यांना ही माहिती कळताच गावकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. औरंगाबाद शहरात कोरोना बाधित रुग्णांनी आतापर्यंत अर्धशतक पार केलेले आहे. रोजच्या रोज शहरामध्ये रुग्णात वाढ होत आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात कुठेही कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता परंतु खुलताबाद शहरापासून आठ दहा कीलोमिटर अंतरावर असलेल्या दौलताबाद या एतिहासिक गावात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. सदर महीला 15 दिवस अगोदर औरंगाबाद येथील आरेफ कॉलनीत जाऊन परत आली होती.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment