औरंगाबाद । वार्ताहर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 25 रोजी दाखल करण्यात आलेल्या औरंगाबाद शहरातील किलेअर्कमधील 60 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज (दि.27 रोजी) दुपारी 12.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला, असल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी कळवले आहे.
लेफ्ट साईडेड न्यूमोनायटिस विथ डायबेटिस विथ हायपरटेंशन विथ हायपोथायरॉडीझम या आजारामुळे या रुग्णास घाटीत 25 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. 25 एप्रिल रोजीच त्यांचा स्वॅब घेण्यात आला व त्याच दिवशी त्यांचा कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. घाटीतील उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांचे मृत्यूचे कारण बायलॅटरल न्युमोनाटीस विथ ऍक़्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम ड्यू टू कोविड 19 इन केस ऑफ डायबेटिस मलायटस टाइप टू विथ डायबेटिक नेफ्रोपॅथी, हायपरटेंशन, इस्चेमिक हार्ट डिसिज विथ हायपोथयरॉडिझम असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. प्रसिद्धी पत्रकावर घाटीच्या अधिष्ठाता डॉ.येळीकर यांच्यासह माध्यम समन्वयक डॉ.अरविंद गायकवाड यांच्या स्वाक्षरी आहेत.
Leave a comment