तहसीलदाराने गावाची पाहणी करून उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव वर्ग
विहामाडंवा । वार्ताहर
पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातून पिण्याच्या पाणी टंचाईचे संकट उभे राहत आहे. पैठण तालुक्यात एकूण 107 ग्रामपंचायती आहेत्, त्यात सुलतानपूर, एकतुनी, हर्शी बु. रांजणगाव दांडगा, म्हारोळा, पुसेगाव, यासिनपुर,नानेगाव तसेच मुरादाबाद,थापटी तांडा हिरापूर,घारेगाव अशा गावातील टँकरचे प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावरून पैठण येथील तहसील कार्यालयात पाठविण्यात आले आहे. टँकरचा प्रस्ताव हे तहसील स्तरावरून उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे.यापैकी बालानगर या गावाच्या टँकर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत. अशी जवळपास सात ते अकरा गावांची प्रस्तावही उपविभागीय अधिकार्यांकडे मंजुरीसाठी पाठविले आहे.एप्रिल महिन्याच्या पहिल्या व दुसर्या आठवड्यापासून कडक ऊन वाढले आहे.
एप्रिल महिन्यात तर 36 ओ ते 41 ओ अंशाच्या दरम्यान गेला आहे. परिणामी जलस्त्रोतातील पातळी खालावली आहे. तर काही जलस्त्रोत कोरडे पडू लागले आहेत.त्यामुळे अनेक गावातील ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील ज्या गावांना पाण्याची गरज भासेल त्या ग्रामपंचायतीने तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लवकर उपाययोजना करू-तहसीलदार शेळके
पाणीटंचाई संदर्भात उपाययोजना म्हणून संबंधित गावाचे टँकरचे प्रस्ताव तहसील स्तरावरून उपविभागीय कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. अजून चार नवीन गावाचे प्रस्ताव आले आहेत. तरी पाणीटंचाई संदर्भात सर्व उपाय योजना लवकरात लवकर करण्यात येईल.तसेच अनेक गावातील पाण्याची पाहणी करून ज्या गावात पाण्याची गरज भासत आहे त्याच गावांना टँकरची मंजुरी देण्यात येईल.
Leave a comment