तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते यांची मागणी
सावळदबारा । वार्ताहर
पळसखेडा, देव्हारी शिवारात बधुवारी, गुरुवारी रोजी दोन दिवसांत बिबट्याने हल्ला करून एक बैल ,एक गाय ठार केल्यामुळे सावळदबारा परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत बधुवारी रोजी पळसखेडा शिवारात संध्याकाळच्या दरम्यान बैल चरत असताना बिबट्याने बैलावर हल्ला करून ठार केले आहेत पळसखेडा-टिटवी परिसरातील शेतकरी मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत पळसखेडा शिवारातील शेतात बैल चरत असताना संध्याकाळच्या दरम्यान बिबट्याने बैलावर हल्ला करून ठार केले आहेत.नांदागाव, महालब्धा पिपळवाडी, सावळदबारा, पळसखेडा, देव्हारी या शिवारात या चार महिन्यात सहा घटना घडल्यामुळे सावळदबारा भागातील ग्रामस्थसह शेतकरी मध्ये घबराट निर्माण झाली आहेत.
सावळदबारा सह परिसर हा डोंगर भाग असल्याने वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहे बिबट्या हल्ला करत असल्यामुळे सावळदबारा सह परिसरात दहशत निर्माण झाली आहेत .पळसखेडा शिवारात 22 एप्रिल रोजी गट नंबर 2 च्या शेता लागत बधुवारी संध्याकाळी दरम्यान बिबट्याने बैलावर हल्ला करून ठार केले आहेत टिटवी येथिल शेतकरी प्रेमसिंग शंकर राठोड यांचा बैल होता, देव्हारी येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यावर हल्ला करून गाय ठार केले आहेत देव्हारी शिवारातील शेतात गट क्र 19 गोठा आहेत तिथे जनावरांना बांधले होते गुरुवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात जाऊन गायीवर हल्ला करून ठार केले आहेत बाजुला ओढून नेले होते देव्हारी येथिल पंचफुला राजेश जाधव यांची गाय होती. घटनाची माहिती मिळाताच शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते यांनी वन विभागाला कळविले. सावळदबारा शिवार हा परिसर सर्पूण डोंगर भागात आहेत काही महिना पूर्वी वन विभागाने नांदागाव शिवारात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता वनपरिक्षेत्र अधिकारी एस पी मांगदरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस डी कुचे,पी ए गवळी, वाघ,नन्नवरे यांनी गुरूवारी,शुक्रवारी दोन्ही ठिकाणीचा पंचनामा केला आहेत या बिबट्याचे हल्लामुळे शेतकरी ग्रामस्थ मध्ये घबराट निर्माण तर झालीच परंतु त्याचे पशुधनास धोका निर्माण झाला आहे या अगोदर सुद्धा सावळदबारा परिसरात बिबट्याचे हल्ला झालेल्या आहेत वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्यात पशुधानाची हानी झालेल्या शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते व शेतकर्यांनी केली आहेत
Leave a comment