शिवना । वार्ताहर
शिवना: गरीब आणि गरजू लोकांना लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे रेशन दिले जाणार आहे. त्यासाठी शिवना गावातील रेशन दुकान नंबर 59 चालक संतोष खंडेलवाल यांनी आज सुरवात केली आहे. शिवाय रेशनकार्ड नसले तरी लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याशिवाय उपासमारीची वेळ कुठल्याही कुटुंबावर येवू नये म्हणून एक फॉर्म भरण्यासाठी रेशन दुकानावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फॉर्म भरुन प्रत्येकाला आता मोफत अन्न धान्य मिळणार,
रेशन दुकानावर कार्डधारकांना एप्रिल महिन्याचे धान्य नियमित दरानुसार विक्री करण्यात येत आहे.त्यामध्ये कार्डधारकांना पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्यात येत आहे. अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेतील कार्डधारकांनाच हे धान्य उपलब्ध होणार आहे असे दुकानदार खंडेलवाल यांनी सांगितले.
कोरोना संकटामुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलासा देण्याच प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य रेशनदुकानावर मोफत उपलब्ध करुन देण्याची सोय केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली असून या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. रेशन दुकानावर कार्डधारकांना पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्यात आले त्यावेळी सरपंच संतोष जगताप,पंचायत समिती सदस्य शेख सलीम आणि तंटामुक्ती उपाध्यक्ष विनायक काटकर यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले त्यावेळी दुकान मालक संतोष खंडेलवाल यांनी एक मीटरचे अंतर राखण्याची व्यवस्था केली आहे. तंटामुक्ती उपाध्यक्ष विनायक काटकर:- धान्य पुरवठा पारदर्शक व्हावा आणि सार्वजनिक वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवले जावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दुकाननिहाय समित्या गठित करण्यात याव्यात असे मत तंटामुक्ती उपाध्यक्ष विनायक काटकर यांनी व्यक्त केले.
Leave a comment