औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबादकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोमवारी (दि.27)एकाच दिवशी तब्बल 30 नवे रुग्णे आढळले असून, एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी आता अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
औरंगाबाद शहरात 15 मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. परदेशातून आलेल्या एका महिलेला संसर्ग झाला. त्यानंतर तब्बल 15 दिवस शहरात नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता पण दोन एप्रिलला एन- चारमधील एका महिलेला बाधा झाली आणि त्यानंतर आजपर्यंत तब्बल 83 व्यक्ती कोरोनाग्रस्त झाल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी (ता. 25) दाखल करण्यात आलेल्या 60 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा सोमवारी दुपारी साडेबारा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे. लेफ्ट साईडेड न्यूमोनायटिस विथ डायबेटिस विथ हायपरटेंशन विथ हायपोथायरॉडीझम या आजारामुळे किलेअर्क भागातील 60 वर्षीय महिलेला 24 एप्रिलला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 25 एप्रिलला या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. तसेच त्याच दिवशी त्यांचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता.
Leave a comment