कै.भुदेवी गोरंट्याल अन्नछत्रास जालन्यात प्रारंभ 

जालना ।वार्ताहर

जालना शहरातील प्रत्येक भागात अन्नाचे पाकीट पोहचवून काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोर-गरीबांची भुक भागविण्यासाठी पुढाकार घ्यावा. सद्याच्या परिस्थितीत कामगार, मजुर आणि गोर-गरीब कुटूंबांच्या दृष्टीने अत्यंत कठीन काळ असून या कालावधीत केलेली मदत सदैव अविस्मरनिय राहील असे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्यांनी यांनी आज येथे बोलतांना केले. राज्यात कोरोना या संसंर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभुमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यवसायासह दैनंदिन कामकाज बंद पडलेले आहेत. त्यामुळे दररोज मोलमजुरी करून आपल्यासह कुटूंबाचा उदनिर्वाह चालविणार्या कामगार, मजुर, छोटे-छोटे व्यवसायीक अत्यंत अडचणीत सापडले आहेत. अशा सर्व गरजु लोकांना अन्नाचा पुरवठा करण्यासाठी जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी पुढाकार घेत मातोश्री कै. भुदेवी किसनराव गोरंट्याल अन्नछत्रास आज सोमवार पासून प्रारंभ केला आहे.  

मंगळबाजार भागातील मोतीबंगला परिसरात या उपक्रमाचा शुभारंभ आ. कैलास गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्याचे उद्योजक श्री. नरेंद्र अग्रवाल यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राम सावंत, नगरसेवक महाविर ढक्का, जगदिश भरतिया, रमेश गौरक्षक, संजय भगत, योगेश भोरे, डॉ. विशाल धानुरे, गणेश चौधरी, गोपाल चित्राल, किशोर गरदास आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलतांना आ. गोरंट्याल म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर प्रांरभी राज्यशासनाने लागू केलेली संचारबंदी आणि त्यानंतर केंद्र शासनाने लॉकडाऊनचे दिलेले आदेश यामुळे जालना शहरातील विविध उद्योग आणि कारखाने बंद पडले असून बांधकामासह छोटे व्यवसाय देखील बंद पडलेले आहे. त्यामुळे दररोज मोल मजुरी करून आपला आणि कुटूंबाचा उदनिर्वाह भागविणार्या गोर-गरीबांसमोर दररोजच्या अन्नपाण्याचा प्रश्‍न कठीण होऊन बसला आहे. ही बाब लक्षात घेवून आपण संचारबंदी, लॉकडाऊन कालावधीत शहरातील प्रत्येक भागात गोर-गरीब कुटूंबाना नगरसेवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून धान्य वाटपासह जालना शहर व जिल्हा काँग्रेसतर्ङ्गे तयार अन्नाचे पाकीटे वाटप करून गरजुंची भुक भागविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू येत्या 3 मे पर्यंत लॉकडाऊनचे आदेश असल्यामुळे गरीब कुटूंबासमोरील अन्नधान्याचे संकट अधिकच बिकट असल्याने आपल्या मातोश्री कै. श्रीमती भुदेवी किसनराव गोरंट्याल अन्नछत्राच्या माध्यमातून गरीबांच्या अन्नाची गरज भागविण्याचा प्रयत्न केला जात असून या अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज अडीच हजार अन्नाचे पाकीट नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शहरातील गरजुपर्यंत पोहचविले जाणार असल्याचे सांगून आ. गोरंट्याल म्हणाले की, जालना शहराच्या बायपास रस्त्यावरून पाई जाणार्या लोकांची अन्नपाण्याची व्यवस्था करण्याच्या सुचना देखील आ. गोरंटयाल यांनी उपस्थित नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना केला आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.