जालना । वार्ताहर
समस्त महाजन मुंबई, आनंद नगरी सेवाभावी संस्था, घाणेवाडी जलसंरक्षण मंच आणि 100 छ सोशल क्लब यांच्या सह शहरातील विविध 45 सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमान रविवारी अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर कुंडलिका व सीना संरक्षण अभियानांतर्गत नद्यांच्या पात्रातील कचरा उचलून स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे रोटरी क्लब ऑङ्ग जालना रेनबो, स्वच्छता मित्र सेवाभावी संस्था आणि आय एम ए , जालना यांनी सीना नदी बस स्थानक पुल परिसर आणि गोल्डन ज्युबली शाळेच्या जवळचा संतोषी माता पुल परिसर , कुंडलिका नदी , बाळासाहेब ठाकरे रामतीर्थ बंधारा, देहेडकरवाडी पुल परिसर येथील कामांची जबाबदारी घेऊन स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे.
समस्त महाजन आणि विविध सामाजिक संस्था, जालना नगर पालिका व लोकसहभागातून लॉकडाऊन च्या सगळ्या नियमांचे पालन करून हे काम आपण पूर्ण करणार आहोत...नूतन देसाई, विश्वात, समस्त महाजन. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी कुंडलिका व सिना नद्यांच्या या स्वच्छता मोहिमेला परवानगी दिली आहे दोन जेसीबी आणि एक पोचलो च्या साहाय्याने कामाला रविवार सकाळी सुरुवात झाली यावेळी जिल्हा पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरवडकर यांच्या हस्ते पोकलॅन ,जेसीबी ऑपरेटर सुदाम,अशरद,राम मोरे,अरविंद यांना संरक्षक किट देण्यात आले. भाईश्री रमेशभाई पटेल यांनी या सगळ्या किट आणि सॅनिटायझर दिले आहेत. नदीच्या पात्रात कार्यक्रम न करता प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. लॉकडाऊन आणि करोना संसर्गजन्य आजार साथ पसरण्याच्या पूर्वी या मोहिमेला सुरुवात झाली होती दरम्यान लॉकडाऊन मुळे हे काम थांबवण्यात आले होते ते पुन्हा सुरुवात करण्यात आले आहे.
Leave a comment