आरोपीविरूध्द गुन्हा दाखल
बदनापूर । वार्ताहर
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक बंद असताना आडमार्गाने बंदी असलेला गुटखा विक्री साठी नेत असताना चिखली- दाभाडी या रस्त्यावर बदनापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून 2 लक्ष 80 हजार इतक्या किमतीचा 20 बॅग गुटखा व एक कार जप्त करून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केल्यामुळे चोरटी गुटखा विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जमावबंदी व अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक बंदी आहे. लॉकडाऊन काळातही अवैध गुटखा विक्री करणार्यांचे धंदे सुरूच असून मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी नाकेबंदी असल्यामुळे हे गुटखा विक्री करणारे आडमार्गाचा वापर करत असल्याचे आढळून येत आहे.
चिखली ते दाभाडी या रस्त्यावर आज एक मारुती डिझायर कार (क्रमांक एमएच 06, एझेड 9954) मधून चोरटी गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त खबर्यामार्ङ्गत पोलिस निरीक्षक मारुती खेडेकर यांना मिळाल्यावरून बदनापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत या रस्त्यावर दाभाडी बिटचे पोलिस कर्मचारी अनिल चव्हाण यांनी राजूरकडून येणार्या या कारला थांबवले असता कारमध्ये चालकाची अधिक चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली कारची डिक्की तपासली असता या कारमध्ये अवैधरित्या विक्री करण्यासाठी गुटखा दिसून आल्याने व चालक उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचे दिसून आल्याने अनिल चव्हाण यांनी हे वाहन थेट बदनापूर पोलिस ठाण्यात आणले. पोलिस निरीक्षक खेडकर यांनी तपासणी केली असता या कारमध्ये महाराष्टा्रत विक्री करण्यास बंदी असलेला गुटखा असल्याचे प्रर्थमदर्शनी आढळून आल्यामुळे त्यांनी अन्न व औषधी कार्यालयातील अधिकार्यांना या बाबत कळवले. अन्न व औषधी विभागाचे अधिकारी जालन्याहून बदनापूर येथे दाखल झाल्यानंतर कारमधील गुटखा बाहेर काढण्यात आला. या वेळी 20 गोण्या भरून हा गुटखा असल्याचे दिसून आले. या गुटख्याची किंमत 2 लक्ष 80 हजार इतकी असून बदनापूर पोलिसांनी सदरील कार व गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी चालकाची चौकशी केल्यानंतर सदरील गुटखा राजूर परिसरातून आल्याची प्राथमिक माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, अनिल चव्हाण, यांच्या पथकाने थेट राजूर येथे धडक मारुन यातील शोध घेऊन आरोपी निसार अनिस सिद्दीकी, रा. भोकरदन व संदीप भूमकर, रा. राजूर याला पकडून गुन्हा नोंद केला आहे. बदनापूर पोलिसांनी आडरस्त्याने वाहतूक होणारा गुटखा व त्याची आरोपी अवघ्या 4 तासात जेरबंद केल्यामुळे गुटखा माङ्गियांचे धाबे दणाणले आहे
Leave a comment