खते, बि-बियाणांचा काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाई करा-पालकमंत्री राजेश टोपे

जालना । वार्ताहर

शेतकर्‍यांना पेरणीसाठी देण्यात येणार्‍या बि-बियाणांच्या वाणाचा दर्जा उत्तम राखण्यात यावा.  शेतकर्‍यांना खते, बि-बियाणे रास्तभावाने मिळतील, याची दक्षता घेण्यात यावी.   खतांचा अथवा बि-बियाणांचा काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, राज्याचं संपुर्ण अर्थकारण हे शेतीवरच अवलंबून आहे.  शेतकर्‍यांना पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे खते, औजारे आदी साहित्य मुबलक प्रमाणात मिळावेत.  शेतकर्‍यांना पेरणीसाठी कर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते.  गत तीन वर्षामध्ये दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी प्रमाणात पीककर्जाचे वितरण करण्यात आले असल्याने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत यावर्षामध्ये ठरिवण्यात आलेले 1120 कोटी रुपयांचे उद्दिष्ट वाढवुन ते 1500 कोटी रुपये करण्याच्या सुचना करत दिलेले उद्दिष्ट हे शंभर टक्के पुर्ण झाले पाहिजे. ज्या बँका दिलेले उद्दिष्ट पुर्ण करण्यात असमर्थ ठरतील अशा बँकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले. जिल्ह्यात शेतकर्‍यांना वीज पुरवठ्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत.  शेतकर्‍यांना मुबलक वीज पुरवठ्यासाठी विद्युत विभागाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सुचना करत टंचाईच्या काळामध्ये आवश्यकता असेल त्या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा तसेच टंचाईबाबतच्या उपाययोजना राबविण्याचे अधिकार उप विभागीय अधिकारी यांना देण्यात आले असुन पाणीपुरवठ्या संदर्भात एकही तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पिकवलेला कापुस विकला गेला पाहिजे.  यासाठी जिल्ह्यात आवश्यकतेनुसार कापुस खरेदी केंद्रे सुरु करण्यात यावीत. तसेच जिल्ह्यातील मोसंबी, द्राक्ष यासह फळे विक्रीसाठीही मार्केट उपलब्ध होणे गरजेचे असुन यासाठी मार्केट सुरु करण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. लॉकडाऊनच्या काळामध्ये केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असुन केशरी शिधापत्रिका धारकांनाही 8 रुपये व 12 रुपये किलो दराने गहू देण्याबाबत सुचना देण्यात आल्याआहेत.  जिल्ह्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देत प्रत्येक गरजुला धान्याचे वितरण करण्यात यावे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.