परतूर । वार्ताहर
तालुक्यातील पिम्प्रुळा येथील शेतकरी वचिष्ट मुंजाजी गाडगे यांच्या घराला आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्यासह शेतीची अवजारे जळून खाक झाली होती.त्यामुळे या शेतकर्याचा संसार अक्षरशः उघड्यावर आला होता.ऐन कोरोनाच्या संकटातच घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याने सदरील शेतकरी हवालदील झाला होता.दरम्यान,ही बातमी कळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा क्रुषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिलभैया आकात यांनी शनिवारी (दि.25) गावात जाऊन शेतकरी वचिष्ट गाडगे यांची भेट घेतली.झालेल्या नुकसानीची पाहणी केली.कुटुंबाचे सांत्वन केले.सोबतच आर्थिक मदत म्हणून 25 हजार रुपयांचा धनादेश दिला.यावेळी आकात यांच्या समवेत माजी सरपंच बालुनाना गाडगे, जिजा गाडगे, महादेव देवक,अंकुश बरकुले, योगेश पाटील बरकुले,गजानन गाडगे,राजेश गाडगे, शेषराव गाडगे ईतरांची उपस्थिती होती.
घराला अचानक लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तुंसह शेतीची महत्वाची अवजारे जळून खाक झाली.आगीत मोठे नुकसान झाले.आमचे कुटुंब पार हादरून गेले.कोरोनामुळे सध्या कामधंदा राहिलेला नाही.त्यामुळे आर्थिक संकटात सापडलो आहे.कपिलभैया आकात यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. -- वचिष्ट गाडगे,शेतकरी,पिम्प्रुळा , ता.परतूर.
Leave a comment