कुंभार पिंपळगाव । वार्ताहर

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव बाजार पेठेत ता.26 एप्रिल रविवार रोजी अक्षय्यतृतीयाच्या शुभ मुहार्तावर  आंबे विक्रीस प्रारंभ झाला असून बाजार पेठेत कोरोना व्हायरसचा  परिणाम झाला असून  बाजारात आज साडेतिन मुहार्ता पैकी एक पुर्ण वेळ मुहुर्त आसलेल्या दिनी आज पहिल्यांदा बाजारात गर्दी नव्हती .सगळी कडे भिंती दायक वातावरण होते .सोन्याच्या दुकान बंद होत्या आजचा दिवस म्हणजे सोने खरेदीचा शुभ दिवस होय .परंतु आज बाजारात फक्त आबें खरेदी करताना नागरीक दिसत होते तेही तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळत खरेदी करण्यात आली . आब्याचे भाव स्थिर होते .बदाम,80 ,लंगडा 80 ,हाफुस 110,पायरी 250  आदि रूपये किंमतीची आंबे बाजारात आली होती्. तर पितृ पुजनासाठी कळस घेण्यासाठी सकाळी - सकाळी  बाजारात कोरोनाचा विसर पडत गर्दी झाली होती.

 अक्षय्यतृतीया हा साडेतीन  मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो.वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्यतृतीया असे म्हणतात.ग्रामीण भागात या सणाला आखिदी,आखाजी असेही म्हणतात.अक्षय्यतृतीया जर बुधवारी व रोहिणी नक्षत्रावर आली तर तिचे विशेष महत्त्व मानले जाते.याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात .श्रीविष्णूंच्या 24 अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रकट झाला. याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याचदिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली्.अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. याच दिवशी लग्न समारंभ ही मोठ्या उत्साहात पार पाडले जातात परंतू कोरोना व्हायरसमुळे लग्नसमारंभालाही ब्रेक लागला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.