तोडणार्यांना अडीच हजाराचा दंड
जालना । वार्ताहर
कोरोना संसर्गाच्या लढाईत जालना शहरास वाचविण्यासाठी निर्जंतुकीकरण फवारणी मोहिम राबविण्यासह प्रतिबंधक कारवाई करणारे स्वच्छता व फायर ब्रिगेड विभागातील कोरोना योध्द्यांचा भाजपा कार्यकर्ते प्रकाश जायभाये यांनी रविवारी (ता.26) मास्क देत सत्कार केला.तथापि नूतन वसाहत भागात नियम तोडणार्यां कडून अडीच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार तसेच नगराध्यक्षांच्या सूचनेवरून जालना शहरात निर्जंतुकीकरण फवारणी मोहिम वेगवान रितीने सुरू असून मुख्याधिकारी नितीन नार्वेकर स्वच्छता विभाग प्रमुख संजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली प्र.स्वच्छता विभाग प्रमुख अरूण वानखेडे यांनी सहकार्यांसह आज नुतन वसाहत झोन मधील आनंदवाडी, राम मंदिर परिसर, सहकार बँक कॉलनी या ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी मोहिम यशस्वी केली. दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिलेल्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष आ.संतोष दानवे,भास्करराव दानवे,अशोक आण्णा पांगारकर,शहराध्यक्ष राजेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली शहरात मास्क व सॅनिटाइजर वितरण सुरू असून भाजपा कार्यकर्ते प्रकाश जायभाये यांनी या निर्जंतुकीकरण फवारणी मोहिमेतील स्वच्छता निरिक्षक अरूण वानखेडे, दफेदार श्रावण सराटे, बाळू पवार, सागर गडकरी, अविनाश साळवे, उत्तम भालेराव यांना मास्क वितरित करून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी नगरसेवक अरूण मगरे, शिवाजीराव आर्दड, म्हस्के आदींची उपस्थिती होती. दरम्यान नूतन वसाहत झोन अंतर्गत पोलीसांच्या मदतीने मास्क न लावता फिरणारे तसेच सोशल डिस्टन्स चे उल्लंघन करतांना पाच व्यक्ती आढळून आल्या त्यांच्या कडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे अडीच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
Leave a comment