*जालना जिल्हा कोरोना मुक्त:त्या महिलांचे अहवाल निगेटिव्ह*
जालना: शहरातील महिलेसह परतूर तालुकातील शिरोडा येथील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलेचा दुसरा अहवाल शनिवारी रात्री उशिरा निगेटिव्ह प्राप्त आला असून जालना जिल्हा आता कोरोना मुक्त झाला आहे.या बाबत प्रशासकीय यंत्रणेने अधिकृत घोषणा केलेली नाही
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दीड महिन्यापासून आरोग्य विभागाचे डोकटर परिश्रम घेत होते. त्यांच्या अखंड प्रयत्नाचे हे यश मानले जात आहे. जालना शहरातील दुःखी नगर व परतूर तालुक्यातील शिरोडा येथील एक अशा दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांच्यावर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र सतर्क राहून योग्य ते उपचार केले. दुःखी नगर मधील महिलेचा आतापर्यंत तीन वेळा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर देखील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आपला सकारात्मक लढा कायम ठेवला.परिणामी काल शुक्रवारी रात्री उशिरा दुःखी नगर मधील महिलेसह शिरोडा येथील अशा दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या महिलांचे अहवाल प्रयोग शाळेकडून निगेटिव्ह प्राप्त झाले होते. त्यामुळे जिल्हा कोरोना मुक्त होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दरम्यान, निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातर्फे या दोन्ही रुग्ण महिलांच्या लाळेचे नमुने घेऊन ते औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे शनिवारी सकाळी तपासणीसाठी पाठवले होते. विशेष म्हणजे प्रयोग शाळेकडून याबाबतचा अहवाल काही वेळापूर्वीच जिल्हा सरकारी रुग्णालयास प्राप्त झाला असून या अहवालात या दोन्ही महिला निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे शनिवारी जालना जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे.सरकारी यंत्रणे कडून या बाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
Leave a comment