आजपर्यंत 862 ऊसतोड कामगार जालना जिल्ह्यात दाखल
जालना । वार्ताहर
लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असुन दि. 25 एप्रिल, 2020 पर्यंत एकुण 862 ऊसतोड कामागारांना जिल्ह्यामध्ये आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात सांगली-72 कोल्हापुर 19, व सातारा येथुन 6 असे एकुण 97 कामगार, घनसावंगी तालुक्यात सांगली-63, कोल्हापुर-43 व सातारा-85 असे एकुण 191 कामगार, तर अंबड तालुक्यात बीड-25, पुणे-17, सांगली 113, कोल्हापुर-83, सातारा-133, सोलापुर-49 व लातुर येथुन 02 असे एकुण 422 कामगार दाखल झाले आहेत.
सध्या सामान रुग्णालय, जालना येथे दु:खीनगर येथील कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 892 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 95 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 571 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 22 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 768 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 02 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 730, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 103, एकुण प्रलंबित नमुने-29 तर एकुण 476 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 10, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 315 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 08, सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती -271, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-17, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 95, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 149 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.
जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 271 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना - 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-18, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-14, पोलीस प्रशिक्षण केंद्र-99, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 367 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 62 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 455 वाहने जप्त मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार असा एकुण 2 लाख 85 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे
Leave a comment